मुंबई – आज आनंदाचा दिवस आहे. साजरा करा. उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका. जाबोरी मैदानात आम्ही परवानगीच मागितली नव्हती. 2 वर्षापूर्वी अडीच कोटी फंड देऊन सुशोभीकरण केले होते. उगाच राजकारण आणू नका. निवडणुका येतील तेव्हा येतील. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून बालिशपणा करून नका, असा टोला आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपला लगावला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आज सगळीकडे उत्साह चांगला आहे. लहानपणापासून आम्ही हंडी बघतोय. आज सुरक्षित गोविंदा साजरा होतोय हे चांगले आहे. गेली २ वर्ष कोविड काळात गेले. यंदा लोक उत्साहात बाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी मी जातोय. दहिहंडी सगळीकडे साजरी होते. आजच्या दिवशी मला पोरकट राजकारणात जायचे नाही. आनंदाचा क्षण साजरा करायला. सगळ्यांना हा क्षण साजरा करू द्या असे त्यांनी सांगितले.
जांबोरी मैदानावरून शिवसेना- भाजप समोरासमोर –
वरळीत दरवर्षी जांबोरी मैदानात सचिन अहिरयांची संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहिकाला उत्सव साजरा केला. मात्र, यंदा जांबोरीच्या मैदानात भाजपने दहिहंडी उस्तव आयोजित केला आहे. भाजपने जांबोरी मैदान घेतले त्यावरून शिवसेनेवर टीका होऊल लागली. 3 आमदार 1 खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही शिवसेनेला जांबोरी मैदान मिळाले नाही, अशी टीका भाजपकडून होऊ लागली. त्यामुळे शिवसेनेतही पक्षप्रमुख नाराज झाले होते. त्यानंतर श्रीराम मिल चौकात शिवसेनेकडून दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला.