घरमुंबईतुम्ही भांडणं लावणाऱ्यांचं सरकार आणणार की चूल पेटवणाऱ्यांचं सरकार आणणार ? –...

तुम्ही भांडणं लावणाऱ्यांचं सरकार आणणार की चूल पेटवणाऱ्यांचं सरकार आणणार ? – आदित्य ठाकरे

Subscribe

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री राज्यभर जात होते. राज्यतल्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केली. कोविड काळात जे काम महाराष्ट्राने केले त्याचे कौतुक महाराष्ट्र किंवा देशाने नाही तर जगाने केले त्याचा अभिमान आपल्याला असायला हवा. तुम्ही भांडणे लावणाऱ्यांचे सरकार आणणार की चूल पेटवणाऱ्यांचे सरकार आणणार ? असे अदित्य ठाकरे म्हणाले.

2020 चा काळात ८ मार्च रोजी अजित पवार यांनी बजेट सादर केले. शेतकरी कर्जमाफीनंतरचे हे बजेट होते. त्यानंतर कोविड काळात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि 15 दिवसात हॉस्पिटल उभे करण्याचे आदेश दिले. आपला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने होता. केंद्राने अचानकपणे लॉकडाऊन जाहीर केला. मुख्यमंत्री लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन येऊन लोकांना मार्गदर्शन करायचे तेव्हा लोकांना वाटायचे हा आपल्या कुटुंबातील व्यक्ती बोलत आहे. असा मुख्यमंत्री असायला हवा. आपण कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न दाखवून जगाला दाखऊन दिला आहे. देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये आपले मुख्यमंत्री असतात. त्याचा आम्हाला एक शिवसैनिक म्हणून कौतुक आणि अभिमान आहे.

- Advertisement -

कोरोना काळातही आपला विकास थांबला नाही. उलट महाविकास आघाडीने शाश्वत विकास दिला. मेट्रोची कामे, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मुंबई नागपूर हायवे अशी अनेक कामे सुरु होती आणि आहेत. अर्थचक्र सुरु ठेवण्याचे मोठं आव्हान आपल्यासमोर होते. पण तरीही आपण विकासकामे थांबवली नाहीत. बीएमसीची कामे, महाराष्ट्र सरकारची कामे अनेक आहेत. जेव्हा आपल्या राज्यात देशात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महागाई, बेरोजगारी, समाजात, माणसात भांडण लावले जाते, अनेकांनी वेगवेगळे रंग हातात धरले आहेत. अशावेळी तुम्ही भांडणं लावणाऱ्यांचं सरकार आणणार आहात की चूल पेटवणाऱ्यांचं सरकार आणणार आहात? हे ठरवायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -