घरताज्या घडामोडीकोस्टल रोड कामाअंतर्गत भुयारी मार्गाच्या खोदकामाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी

कोस्टल रोड कामाअंतर्गत भुयारी मार्गाच्या खोदकामाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी

Subscribe

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी करून कामातील अडचणी, कामाची प्रगती याचा आढावा घेतला.

मुंबईतील नव्हे देशातील पहिल्या कोस्टल रोडचे काम सध्या जोमाने सुरू आहे. सध्या भुयारी मार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. आतापर्यंत १६० मीटरपेक्षाही जास्त लांबीचे भुयारी मार्ग खोदण्यात आले आहे. या कोस्टल रोडच्या उभारणीमुळे मुंबईकरांचा विशेषतः पश्चिम उपनगरातील नागरिकांचा प्रवास हा सुखकर होणार आहे. आतापर्यंत २५ टक्केपेक्षाही जास्त काम झाले आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी, या कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाच्या कामाची शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारस पाहणी करून कामातील अडचणी, कामाची प्रगती याचा आढावा घेतला. कोस्टल रोड प्रकल्पाच्या पॅकेज -४ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत प्रत्येकी २.०७ किमी लांबीचे दोन बोगदे ‘मावळा’ संयंत्राद्वारे (टनेल बोअरिंग मशीन) खोदण्यात येत आहेत.

- Advertisement -

एक बोगदा उत्तर मुंबईकडे जाणारा तर दुसरा बोगदा दक्षिण मुंबईकडे येणारा असणारा आहे. या बोगद्याला अमरसन्स, हाजीअली व वरळी या तीन ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. ११ ठिकाणी दोन्ही टनेल एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आप्तकाळात एका बोगद्यामधून दुसऱ्या बोगद्यात जाता येणार आहे. प्रत्येक बोगदा खोदण्यासाठी ९ महिने याप्रमाणे १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कोस्टल रोडच्या संपूर्ण बांधकामावर १२ हजार ७२१कोटी रुपये खर्चण्यात येणार आहे. आतापर्यंत १६० मीटरचे काम पूर्ण झाले आहे.


हेही वाचा – लाचखोर पोलीस नाईक गजाआड

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -