रामदास कदमांच्या भावावरील ईडी कारवाईवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Aditya-Thackeray

रामदास कदम यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. भाऊ सदानंद कदम यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. दरम्यान यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे. ही सूडबुद्धीने कारवाई केलेली असून देशात लोकशाही जिवंत आहे की नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.

रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिलीय.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, देशभरात विरोधी पक्षात जे बसलेले आहेत, जे सरकारविरोधात बोलतात, त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहेत. सत्याच्या बाजूने उभं राहण्यांवर कारवाई केल्या जात आहेत. आम्ही सगळे इंसाफ के सिपाही म्हणून लढत आहोत. जे गद्दार पक्ष सोडून भाजपात गेले त्यांच्यावरील केसेस काढल्या जातात आणि जे आमच्य़ासोबत आहेत त्यांच्यावर सूडभावनेने गुन्हे दाखल केले जात आहेत. देशभरात हा पॅटर्नच बनलाय. त्यामुळे देशात राजकीय स्वातंत्र्य आणि लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.”

यापुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांच्या पहिल्या अर्थसंकल्पावर टीका केलीय. या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाच हाच मोठा प्रश्न आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच महिला खासदाराला शिव्या देणारे नेते या मंत्रिमंडळात असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय.

रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पध्दतीचे अपडेटस आले आहेत. खत खरेदी करताना दुकानदारांकडून आपल्या जाती बद्दलची विचारणा होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. यावरही आदित्य ठाकरेंनी आपलं मत व्यक्त केलंय. “शिवसेनेनं कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही. केंद्र सरकारला यातून डेटा कलेक्ट करायचा असेल. परंतू ज्यांना हिंदुस्तानी म्हणून जात लिहायची असेल त्यात काही गैर नाही.” असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.