श्रीधर पाटणकरांच्या ईडी कारवाईवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर आज झालेल्या ईडी कारवाईनंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (cm uddhav thackeray)  यांचे मेहूणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar ED action)  यांच्या संपत्तीवर आज ईडीने छापेमारी केली. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray)  प्रतिक्रिया देत “श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती घेऊन बोलू” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. “ईडीच्या कारवायांचा सरकारवर काही फरक पडत नाही हे आपणा सर्वांना माहितीच आहे परंतु श्रीधर पाटणक यांच्यावर आज झालेल्या कारवाईची माहिती घेऊन मी बोलेन. माहिती न घेतल्याशिवाय मी बोलणार नाही ” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर आज झालेल्या ईडी कारवाईनंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. “अशा कारवायांना शिवसेना कधी घाबरली नाही आणि कधी घाबरणार नाही”, असा इशारा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला दिला आहे. गैरकामांची चौकशी नक्की करावी, परंतु सुड बुद्धीने, आकसापोटी, राजकीय सुडाच्या भावनेने अशा प्रकारची कारवाई लोकशाहीत करणे योग्य नाही. अशा कारवायांना सेना कधीही घाबरली नाही आणि कधीही घाबरणार नाही. महाविकास आघाडी सरकार कधीही अस्थिर होणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाजपला चांगलाच टोला लगावलाय. तुम्ही आम्हाला जेवढे डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ. तुम्ही डिवचताय म्हणून आम्ही कधीही कोसळून पडणार नाही. महाराष्ट्राची जनचा आंधळी नाहीये. तुम्ही घरात घुसून सरकार पाडू अशा मानसिकतेत असाल तर महाराष्ट्रातील जनतेला राज्यात काय सुरू आहे हे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. हे सुडाच राजकारण आहे. हे पाहुणे महाविकास आघाडीतील सर्वांच्या घरी जाणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी पोहे आणि चिवड्याची सोय नाश्त्यासाठी करुन ठेवली पाहिजे, असा टोला आव्हाडांनी लगावला.


हेही वाचा – ‘अशा कारवायांना शिवसेना कधी घाबरली नाही आणि कधी घाबरणार नाही’ – एकनाथ शिंदे