Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतील विकासकामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत - आदित्य ठाकरे

मुंबईतील विकासकामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत – आदित्य ठाकरे

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या विकासाबरोबरच सौंदर्यीकरणात भर घालून सुरक्षित, स्वच्छ आणि हरित मुंबईसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत मुंबईतील विकासकामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, असे प्रतिपादन मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केले.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर नागरिकांसाठी सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज कलानगर जंक्शन येथे शुभारंभ झाला. यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबईत अधिक प्रमाणावर सुरक्षित आणि सुंदर अर्बन स्पेसेस तयार करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. वांद्रे येथील कलानगर जंक्शन ते विमानतळ या महामार्गावर लँडस्केप, नवे बसस्टॉप, हॉर्टिकल्चर, सौंदर्यीकरण, पर्यावरण पूरक टॉयलेट्स अशा अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. वाहतुकीचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा आणि सुखकर होईल. हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -