घरमुंबई'पुनर्विकासासाठी ठोस कायदा करा'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘पुनर्विकासासाठी ठोस कायदा करा’; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी डोंगरी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळल्यानंतर सुरक्षेसंबंधित अनेक प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत. मालाडमधील संरक्षण भिंत कोसळल्याची घटना ताजी असतानाच अशाप्रकारची घटना घडणे अत्यंत वाईट आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर होण्यासाठी ठोस कायदा करण्याची मागणी केली आहे.

आदित्य ठाकरेंनी काय म्हटले आहे पत्रात?

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘मंगळवारी मुंबईमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आला आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने, मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पुनर्विकास मान्यता देण्यासाठी कायद्यात रुपांतर करावे. जेणेकरुन उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास लवकर होण्यास मदत होईल. तसेच मुंबई शहरांमध्ये अनेक बिगर उपकरण प्राप्ती इमारती आहेत. यातील धोकादायक इमारतींचादेखील त्याच धर्तीवर पुनर्विकास होण्यासाठी नगरविकास विभागामार्फत संबंधित कायद्यामध्ये दुरुस्ती करावे.’ यासोबतच एस.आर.ए.च्या ३ बी मध्ये अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. त्यांची अधिसुचना काढण्यात यावी, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – पीक विमा कंपन्याविरोधात शिवसेना आक्रमक | इशारा मोर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -