Corona Virus : मुंबईत आजपासून २ हजार कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता, आदित्य ठाकरेंचा इशारा

aditya thackeray warn two thousand corona patient found if corona spread

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली होती. या आढावा बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी आजपासून मुंबईत २ हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता असल्याचे म्हटलं आहे. मुंबईतील कोरोनाबाधित आणि ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार देखील राज्यातील कोरोना आकडेवारीवरुन सतर्कता बाळगताना दिसत आहे.

पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती होती. मंगळवारी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १३७७ वर पोहोचला असून एका दिवसापूर्वीचा 809 चा आकडा ओलांडला आहे. सोमवारच्या तुलनेत प्रकरणांमध्ये जवळपास ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बैठकीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढ पाहता बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटासाठी लसीकरण करण्याचेही नियोजन करण्यात आले होते. घाबरू नका. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपण अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वे आणि सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा केली कारण नवीन वर्ष येत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : 2022 सेलिब्रेशन प्लॅन करताय? राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर, नक्की वाचा