घरCORONA UPDATEजेवण वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीस प्रशासनाचा नकार!

जेवण वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीस प्रशासनाचा नकार!

Subscribe

वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच-पूर्व विभागातील करनिर्धार व संकलन विभागातील कामगार, कर्मचाऱ्यांनी मंगळवारी खार पूर्व येथील वैद्यकीय तपासणी केंद्रांमध्ये कोरोना कोविड तपासणीबाबत चर्चा केली.

लॉक-डाऊनच्या काळात अनेक गरीब,गरजू कुटुंबांसह अडकलेल्या कामगारांना जेवणाची पाकिटे पुरवण्यासाठी महापालिकेने करनिर्धारण व संकलन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परंतु धारावी येथे जेवण वाटप करणाऱ्या विभाग निरिक्षकांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू आणि त्यानंतर धारावी व डि विभागातील विभाग निरिक्षक व शिपायाला झालेली लागण  या पार्श्वभूमीवर या विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यासर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना कोविड १९च्या चाचणीची मागणी केली आहे . परंतु वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भागातील कर्मचाऱ्यांची अशाप्रकारे तपासणी करण्यात येत नसल्याने येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव १४ दिवस क्वारंटाईन करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून त्यांच्या संतापाचा स्फोट या विभागापासून सुरु झाला आहे.

वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच-पूर्व विभागातील करनिर्धार व संकलन विभागातील कामगार, कर्मचाऱ्यांनी मंगळवारी खार पूर्व येथील वैद्यकीय तपासणी केंद्रांमध्ये कोरोना कोविड तपासणीबाबत चर्चा केली. परंतु विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, हे वैद्यकीय केंद्र स्थानिक लोकांसाठी असून आपल्या कर्मचाऱ्यांची कोणतीही तपासणी करता येणार नाही,असे सांगितले. त्यानंतर,  गुरुवारी ७ मे रोजी याच वैद्यकीय केंद्रात या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले . परंतु त्यांची कोविड चाचणी न करता फक्त शारिरीक तापमानची तपासणी करण्यात आली. मात्र, इतर तपासणी करण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी त्यांनी असमर्थता व्यक्त केली . त्यामुळे एच-पूर्व विभागाच्या सहायक करनिर्धारण व संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापुढे सर्व कर्मचारी कोविड १९ची रितसर तपासणी होत नाही तोवर सर्व कर्मचारी खबरदारी म्हणून शुक्रवारी ८ मेपासून १४ दिवस होम क्वारंटाईन होईल. त्या कोविडच्या कामासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी विभागीय सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.

- Advertisement -

१४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी संपुष्टात आल्यानंतर या विभागातील कर्मचारी विभागातील करनिर्धारण याबाबतचे कार्यालयीन कामकाज करतील.  परंतु आपण कार्यालयीन आदेशाची अमलबजावणी करण्याकरता सक्ती केल्यास कोणत्याही कर्मचाऱ्यांचे कोविड -१९या किंवा तत्सम आजाराने काही दुष्पपरिणाम झाल्यास त्यांची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहिल,असाही इशारा दिला आहे.


हे ही वाचा – रस्त्यावर रोमान्स करताना थांबवणं पडलं महागात, महिलेला खावा लागला मार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -