घरमुंबईएमपीएससीकडून १६१ पदांसाठी जाहिरात, 'या' तारखेला होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

एमपीएससीकडून १६१ पदांसाठी जाहिरात, ‘या’ तारखेला होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

Subscribe

उमेदवारांना १२ मे ते १ जून दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल होण्याची तसेच नमूद केलेल्या संवर्गांव्यतिरिक्त नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) १६१ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ ऑगस्टला राज्यभरातील ३७ केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

जाहिरातीनुसार, वित्त आणि लेखा सेवा गट अ सहायक संचालक, नगरपालिका, नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, बालविकास प्रकल्प अधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क सहायक आयुक्त गट ब, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त गट ब, कक्ष अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब आदी पदांच्या १६१ जागा भरल्या जाणार आहेत. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे २१ ते २३ जानेवारी किंवा त्यानंतर मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना १२ मे ते १ जून दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

- Advertisement -

पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल होण्याची तसेच नमूद केलेल्या संवर्गांव्यतिरिक्त नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित, अतिरिक्त किंवा नवीन संवर्गाच्या मागणीपत्रानुसार उपलब्ध होणारी पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील, असे नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -