घरमुंबईरिक्षा-टॅक्सींवरील जाहिरातींची नियमावली लवकरच

रिक्षा-टॅक्सींवरील जाहिरातींची नियमावली लवकरच

Subscribe

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून शिफारस

राज्यभरातील रिक्षा, टॅक्सी, अ‍ॅपवर आधारित कॅब यांच्यावर जाहिराती कशा पद्धतीने लावाव्यात, यासाठी लवकरच राज्य सरकार एक नियमावली तयार करणार आहे. नुकतीच यासंदर्भात परिवहन प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांच्या उपस्थितीत राज्य वाहतूक प्राधिकरणाची बैठक पार पडली. पुणे येथील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून शिफारशी मागविण्यात येणार आहेत. या शिफारशीनंतर एक नियमावली तयार करण्यात येणार आहे.

मुंबईसह राज्यभरात रिक्षा, टॅक्सी, कॅबवर वेगवेगळ्या जाहिराती लावून संबंधित गाडीच्या चालक-मालकाला जास्तीचे उत्पन्न कमाविता येते. मात्र यांदर्भात नियमावली नसल्याने अनेक वेळा जाहिराती लावल्याने प्रवासी वाहतूकदारांना दंड केला जातो. त्यामुळे जाहिराती लावण्यासंदर्भात नियमावली करून राज्य सरकारकडून कायदेशीर परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणार्‍या टॅक्सी चालकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. काही खासगी टॅक्सी कंपन्यांनी वाहतूक विभागाकडून नुकतीच वाहनांवर जाहिराती लावण्याची परवानगी मागितली होती. मात्र यावर अशी नियमावली नसल्यामुळे नियमावली तयार करण्यासाठी परिवहन प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांच्या उपस्थितीत राज्य वाहतूक प्राधिकरणाची एक बैठक झाली.

- Advertisement -

या बैठकीत सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या गाड्यांवर जाहिराती कुठे लावाव्यात, त्याचा आकार किती असावा यावर पुणे स्थित ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’कडून शिफारशी मागविण्यात येणार आहेत. या शिफारशी आल्यानंतर या संदर्भातील नियमावली तयार करण्यात येईल आणि ती मंजुरीसाठी प्राधिकरणाच्या बैठकीत मांडली जाईल. त्यानंतर खासगी कंपन्यांना जाहिराती देता येणे शक्य होणार आहे.

गाड्यांवर जाहिराती कुठे लावाव्यात, त्याचा आकार किती असावा यावर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून मार्गदर्शक सूचना मागितल्या जाणार आहेत. त्यानंतर जाहिराती संबंधित लवकरात लवकर एक नियमावली तयार करण्यात येणार आहे.
– शेखर चन्ने, परिवहन आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -