घरताज्या घडामोडीगहाळ वस्तू किंवा कागदपत्रांचे प्रमाणपत्र देण्यासाठी यापुढे शपथपत्राची गरज नाही

गहाळ वस्तू किंवा कागदपत्रांचे प्रमाणपत्र देण्यासाठी यापुढे शपथपत्राची गरज नाही

Subscribe

वस्तू किंवा कागदपत्र गहाळ झाल्याबाबत नोटरीकडून शपथपत्र करुन आणण्यास सांगणे व त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास नकार देणे ही बाब बेकायदेशीर आणि आक्षेपार्य

बऱ्याचदा एखादी वस्तू किंवा पारपत्र, चेकबूक, परवाना प्रमाणपत्रासारख्या महत्त्वाच्या वस्तू गहाळ झाल्यास तक्रारदार त्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातात. मात्र पोलीस ठाण्यातील कर्तव्यावरील ठाणे अंमलदार तक्रारदाराला गहाळ झालेल्या वस्तू किंवा कागदपत्राचे नोटरीकडून शपथपत्र (Affidavit)  करुन आणण्यास सांगतात त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात नकार दिला जातो. मात्र आता या प्रकाराला आळा बसणार आहे. अशी बाब निदर्शनास आल्यास याची गंभीर नोंद घेऊन संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर खातेनिहाय कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner hemant nagrale) यांनी दिले आहेत. गहाळ झालेल्या वस्तू किंवा कागदपत्रांचे प्रमाणपत्र देण्यासाठी यापुढे कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

वस्तू किंवा कागदपत्र गहाळ झाल्याबाबत नोटरीकडून शपथपत्र करुन आणण्यास सांगणे व त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास नकार देणे ही बाब बेकायदेशीर आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. गहळ झालेल्या वस्तू अगर कागदपत्राबाबत शपथपत्र घेण्याची कोणताही तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही. तरीही पोलिसांकडून शपथपत्राची मागणी करुन तक्रारदाराची अडवणूक केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

एखादी व्यक्ती पोलीस ठाण्यात वस्तू किंवा दस्ताऐवज गहाळ झाल्याची तक्रार देण्यास आली तर त्याच्याकडून गहाळ झालेल्या वस्तू अगर कागदपत्राबाबत गहाळ प्रमाणपत्र देण्याकरीता शपथपत्राची मागणी करु नये,असी बाब निदर्शनास आल्यास सदरबाबत गंभीर नोंद घेऊन संबंधीत कसुरी करणाऱ्यांवर खातेनिहाय कारवाई करण्यात येईल,असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – तर मुंबई शहर राहण्यास अयोग्य ठरेल, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली भीती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -