आर्यन खानला अटक होताच शाहरुखने पठाण सिनेमाचे शुटींग अर्धवट सोडले

शाहरुख खान त्याच्या आगामी पठाण सिनेमाच्या शुटींगसाठी स्पेनला गेला होता

after Aryan Khan was arrested ShahRukh khan Shah Rukh Pathan stopped shooting of pathan movie
आर्यन खानला अटक होताच शाहरुखने पठाण सिनेमाचे शुटींग अर्धवट सोडले

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (ShahRukh khan ) मुलगा आर्यन खान (Aryan Khan ) याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने (NCB) अटक केली. एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकून छापेमारी केली यावेळी त्या पार्टीत आर्यन खान देखील उपस्थित होता. ड्रग्जचे सेवन केल्याची कबूली दिल्यानंतर आर्यन खानला एनसीबीकडून अटक करण्यात आली. मुलाच्या अटकेची बातमी कळताच शाहरुख खान पठाण (Pathan) सिनेमाचे शुटींग अर्धवट टाकून भारतात येण्यासाठी निघाला आहे. शाहरुख खान त्याच्या आगामी पठाण सिनेमाच्या शुटींगसाठी स्पेनला गेला होता. शुटींगमध्ये शाहरुख व्यस्त असताना मुलाला एनसीबीने अटक केल्याची धक्कादायक माहिती समजताच शाहरुख तडकाफडकी स्पेनहून भारतात परतण्यासाठी निघाला आहे. (after Aryan Khan was arrested ShahRukh khan Shah Rukh Pathan stopped shooting of pathan movie)

 

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुखने पठाण सिनेमाचे शुटींग पुढे ढकलले आहे. शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. मुलाच्या अटकेसंदर्भात वेळोवेळीची माहिती जाणून घेण्यासाठी शाहरुख खान सतत एनसीबीच्या संपर्कात आहे. त्याच्याकडे आर्यनची सतत चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतल्यापासून ते अटक करे पर्यंत या प्रकरणात शाहरुख खानकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुलाच्या अटकेनंतर शाहरुखची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शाहरुखच्या बंगल्याखाली माध्यमांनी गर्दी केल्याचे सांगण्यात येत आहे.

 

रविवारी सकाळी आर्यनसह इतर ८ जणांना मुंबईत आणण्यात आले. त्याची एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली. आपण ड्रग्जचे सेवन केल्याची कबूली आर्यनने दिल्यानंतर आर्यनसह २ जणांना एनसीबीने अटक केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथून त्यांना किला कोर्टात हजर केले जाणार आहे.


हेही वाचा – आपल्या मुलानं ड्रग्स घ्यावेत ही शाहरुखची इच्छाच होती…