मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर महानगरपालिकेकडून 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (20 नोव्हेंबर) रोजी करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी रिट्वीट केला होता. त्यांच्या रिट्वीटनंतर महापालिका Action मोडवर आली. (After entrepreneur Anand Mahindras tweet action will be taken against those who throw garbage in the sea 10000 fine)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातील भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकत असलेला व्हिडीओ समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. अनेक नागरिक तसेच मान्यवरांनी या कृत्याबाबत खेद व्यक्त केला होता. या छायचित्राचा दाखला घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी हा कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबर काढून या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य झाले. त्यानंतर या व्यक्तीला ए विभागातील घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात आली.
It hurts just to see this. No amount of improvement in physical infrastructure can improve the city’s quality of life if the civic attitude isn’t transformed. @IqbalSinghChah2 @MumbaiPolice https://t.co/Efh0ssHQ3f
— anand mahindra (@anandmahindra) November 21, 2023
काय होते त्या व्हायरल व्हिडीओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ काही लोक टॅक्सीने येतात, रस्त्याच्या कडेला थांबतात आणि मोठ्या पिशव्यांमध्ये भरलेल्या फुलांचा ढीग पाण्यात टाकतात. एकामागून एक दोन तीन फुलांच्या पिशव्या ते पाण्यात रिचवून मोकळे होतात. यावेळी जवळच उभा असलेला कोणीतरी या सगळ्याचा व्हिडिओ बनवतो. असेसुद्धा त्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते.
हेही वाचा : कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
काय म्हणाले होते उद्योजक आनंद महिंद्रा?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला रिट्वीट करत सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, नागरिकांनी आपला दृष्टिकोन बदलला नाही तर भौतिक पायाभूत सुविधांमध्ये कितीही सुधारणा करून शहराचे जीवन सुधारू शकत नाही. मुंबई पोलिसांव्यतिरिक्त महिंद्राने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनाही त्यांची पोस्ट टॅग केली.
हेही वाचा : Mumbai Crime : वडाळा परिसरातून दिवसाढवळ्या तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण, कल्याणमध्ये विक्रीचा प्रयत्न
सुजान नागरिकही झाले व्यक्त
उद्योगपती आनंद महिंद्रा यांची पोस्ट व्हायरल होताच अनेक युजर्सनी त्यावर कमेंट केल्या. एका युजरने लिहिले की, तुम्ही बरोबर आहात, शहराचा आत्मा भौतिक पायाभूत सुविधांमध्ये नसून लोकांच्या मानसिकतेत आहे. लोकांची वृत्ती, जबाबदारी आणि सामूहिक बदल यातूनच शहराचे जीवन सुधारू शकते. दुसरा युजर्स म्हणाला की, हा फक्त मुंबईचा मुद्दा नाही तर हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे.