घरमुंबईगोरेगाव हायवे येथे एटीएम मशीनसह सौर ऊर्जा सुविधाजनक शौचालय लवकरच

गोरेगाव हायवे येथे एटीएम मशीनसह सौर ऊर्जा सुविधाजनक शौचालय लवकरच

Subscribe

मुंबई | मुंबई महापालिकेने पूर्व द्रुतगती महार्गावर घाटकोपर (Eastern Express Highway-Ghatkopar) येथे उभारलेल्या आधुनिक सेयी सुविधांनीयुक्त शौचालयाला (Swayam Suvidha Toilet) चांगला प्रतिसाद लाभला आहे. आता गोरेगाव ( पूर्व ) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेट जवळ विविध अद्ययावत सोयी सुविधांनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये एटीएम मशीन व सौर ऊर्जा निर्मितीद्वारे विजेच्या बचतीची सुविधा असणार आहे. स्त्री, पुरुष व तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग स्टेशन व पेय पदार्थांसह आदी सुविधा मिळणार आहे.

 

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उप आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार आणि उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात गोरेगाव (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर १ हजार ४५३ फूट एवढ्या प्रशस्त जागेमध्ये सिसिटीव्ही कॅमेऱ्यासह सर्व सोयींनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पी/दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे यांनी दिली आ‌हे.
या प्रस्तावित शौचालयामध्ये पुरूषांसाठी ५ शौचकूप, महिलांसाठी ५ शौचकूप आणि दिव्यांगांसाठी १ शौचकूप असणार आहे.

सौर ऊर्जा निर्मिती व वापर

- Advertisement -

या शौचालयात ऊर्जा बचत व्हावी यासाठी शौचालयाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. या सोलर पॅनलमधून २० किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे. अशाप्रकारे निर्माण होणारी वीज ही विद्युत पुरवठा कंपनीला देण्यात येणार असून विद्युत पुरवठा कंपनीच्या मासिक बिलातून सदर रक्कम वजा केली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच शौचालयाच्या मासिक खर्चात बचत होण्यासह पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -