घरमुंबईपुण्यानंतर मुंबईतही मिनी लॉकडाऊन

पुण्यानंतर मुंबईतही मिनी लॉकडाऊन

Subscribe

मुंबईत लॉकडाऊन नको असेल तर दिलेली नियमावली पाळावी लागेल.

पुण्यात जर मिनीलॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसत असेल तर पुण्याच्या धर्तीवर मुंबईतही लॉकडाऊन तेले जाईल असे संकेत मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर यांनी माहिती दिली. यावेळी लॉकडाऊनविषयी बोलताना महापौर म्हणाल्या, मुंबईत लॉकडाऊन नको असेल तर दिलेली नियमावली पाळावी लागेल. आत्तातरी सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. यावर मुख्यमंत्री काम करत आहेत. कोरोनाची दुसरी येऊ घातली आहे, ती रोखली पाहिजे. पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन झाले. बाकी राज्यांमध्येही मिनी लॉकडाऊन झालेय. त्यामध्ये धार्मिक स्थळे सक्तीने बंद केलीत. तर हॉटेल, पब बंद केलीत. काही ठिकाणी बसमध्ये गर्दी होऊन नये म्हणून पालिकेने स्वयंसेवक नेमले आहते. अशा अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. एखाद्या दुकानात मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्यास यासाठी दुकानदारास जबाबदार ठरले जात आहे. यापूर्वी दुकानांबाहेर किंवा एखाद्या ठिकाणी सोशल डिस्टसिंग पाळण्यासाठी गोल आखून दिले होते मात्र आता लोक एखाद्या जत्रेप्रमाणे सगळीकडे कार्यक्रम करायले लागलेत. त्यामुळे तुमचा हा बिनधास्तपणा तुमच्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालत आहे. असेही महापौर म्हणाल्या.

लॉकडाऊनवर बोलताना महापौर म्हणाल्या, लॉकाडाऊन कोणालाच नको आहे. पण जर निर्बंध घालून दिले असतानाही कोणाला कळणार नसतील तर, आरोग्य सेवा देऊनही असे परिणाम देऊनही जर असे परिणाम दिसत असतील लॉकडाऊन निर्णय घेतला जाऊ शकतो. असे संकेतही दिले. तर आरोग्य सेवा द्यायला आम्ही तयार आम्ही सगळ करायला तयार आहोत. पण जे काही नियम दिले जातायत ते जर पाळणार नसतील तर लोकांनीच सांगायला पाहिजे नेमके नियम काय असावेत. प्रत्येक जण म्हणतयं लॉकडाऊन नकोय खरंच नकोय. पण जर रुग्णसंख्या वाढत असेल मृत्यूंची संख्याही वाढताना दिसतेय. पण असे असतानाही तुमची अपेक्षा असेल काहीच करू नका तर असे होणार नाही. कारण सगळ्यांचे जीव हे लाखमोलाचे आहेत. असे ते म्हणाल्या.

- Advertisement -

त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा संयमाने पाऊले टाकून जर महाराष्ट्रात वाचवण्याकडे कल आहे. आपण जर त्या गाईडलाईन पाळल्या म्हणजे २ मीटरच्या अंतरावर एकमेकांनी राहिला पाहिजे, प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरलाच पाहिजे. हे त्रिसुत्राचे पालन करावे. गर्दीची ठिकाणे टाळली पाहिजेत. कारण नसताना घराबाहेर जाता कामा नये. या सगळ्या गोष्टी जर आपण येणाऱ्या या चार महिन्यात किंवा किमान दोन महिन्यात पाळल्या तर निश्चित संसर्ग रोखला जाऊ शकतो. जो गेल्या मार्चपासून ते सप्टेंबरपर्यंत वाढलेली रुग्णसंख्या आपण कमीही करुन दाखवली आहे. हे नागरिकांच्या, मुंबईकरांच्या सहकार्याने शक्य झाले. त्यामुळे तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. असेही आवाहन महापौरांनी केले.

मुंबईतील आरोग्य सेवेवर बोलताना महापौर म्हणाल्या, महानगरपालिकेकडे लॉकडाऊनबाबत कोणत्याही सुचना अजून तरी आलेल्या नाहीत. परंतु मुख्यमंत्र्यांनी लाईव्हच्या माध्यमातून दिलेल्या सुचनांवर भर देतोय. रुग्णालयामध्ये ३ हजार डिसीएच कोव्हिड बेड दिले आहेत. काही ठिकाणी १२ हजार ९०६ बेडवरून १५ हजार ९७१ बेडपर्य़ंत पोहचलो आहोत. त्यामुळे ४ हजार रिक्त बेड अजूनही शिल्लक आहेत. येत्या दिवसात ३ हजार डिसीएच बेडस् यामध्ये ४०० आयसीयू बेड्सही उपलब्ध होणार आहे. आजही अनेक बेड्स राखीवही आहेत. रुग्णांनी आवडत्या रुग्णालयातील बेड्सची वाट न पाहता लवकर बरे होण्यासाठी उपलब्ध रुग्णालयात भर्ती व्हावे. असे आवाहन त्यांनी केली.

- Advertisement -

विरोधकांना अप्रत्यक्ष टोला

सोशल मीडियाच्या माध्यामातून बघतोय की, ज्या लोकांना महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढलीच पाहिजे असे मनापासून वाटतेय, ते लोक नागरिकांना सोशल मीडियातून उकसवत आहेत. वेगवेगळे विषय उकसवतायतं. सगळ्या विषयांवर हात घालत बोलतायत. पण आता मात्र ही वेळ नाही. आत्ताची वेळ स्वत:सह इतरांचा जीव वाचण्याची आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -