घरठाणेआढावा घेऊनच राजन विचारेंची सुरक्षा कमी केली; ठाणे पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

आढावा घेऊनच राजन विचारेंची सुरक्षा कमी केली; ठाणे पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

Subscribe

ठाणे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. विचारे यांना असलेल्या संभाव्य धोक्याचा विचार करूनच त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त(विशेष शाखा) या सर्वांशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेण्यात आला, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. 

 

मुंबईः संभाव्य धोका यासह अन्य सर्व बाजूंची पडताळणी करूनच ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली, असे प्रतिज्ञापत्र ठाणे पोलिसांनी मंगळवारी उच्च न्यायालयात सादर केले. तसेच अधिकार म्हणून कोणी सुरक्षा मागू शकत नाही किंवा अशा प्रकारे सुरक्षा देण्याचा नियमही नाही, असा दावाही प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

- Advertisement -

ठाणे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. विचारे यांना असलेल्या संभाव्य धोक्याचा विचार करूनच त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त(विशेष शाखा) या सर्वांशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेण्यात आला, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही करणाशिवाय सुरक्षेत कपात करण्यात आली हा खासदार विचारे यांचा आरोप प्रतिज्ञापत्रात फेटाळून लावण्यात आला आहे. संभाव्य धोका असेल तरच सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. सुरक्षा देताना शुल्क आकारले जाते किंवा निशुल्कही सुरक्षा दिली जाते. त्यानंतर सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेतला जातो. त्यामुळे हेतूपूरस्सर सुरक्षेत कपात केली हा खासदार विचारे यांचा दावा तथ्यहिन व आधारहिन आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारने सुरक्षा व्यवस्था कमी केल्याचा आरोत करत ती पूर्ववत करण्याची मागणी करणारी फौजदारी याचिका खासदार विचारे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे पोलीस आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. मी दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपला पाठिंबा देत महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली. तेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींना त्रास देत आहे. त्यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवत आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

माझी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. मी खासदार असल्याने ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर मतदार संघात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला जावे लागते. माझ्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक कमी केल्याने मला व माझ्या कुटुंबाला धोका होऊ शकतो. त्यामुळे माझी सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेचे ठाणे पोलिसांनी प्रत्यूत्तर सादर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -