घरमुंबईराठोडांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू; 'या' आमदारांची नावे चर्चेत

राठोडांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू; ‘या’ आमदारांची नावे चर्चेत

Subscribe

राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. २८ फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही करून तो गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला. राज्यपालांनी त्वरीत त्यावर स्वाक्षरी करून तो मंजूर केला आहे. मात्र, हा राजीनामा गुरूवारी राज्यपालांनी मंजूर केला आहे. दरम्यान राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मुख्यमंत्र्यांकडे वनमंत्रीपदाचा कार्यभार असून आता पुढील वनमंत्री कोण याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाले असून वनमंत्रीपदासाठी नितीन देशमुख, आशिष जयस्वाल ही दोन नाव सध्या चर्चेत असून यासोबत आणखी काही नावं चर्चेत असल्याने आता कोण वनमंत्री पदावर विराजमान होतं याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर गुरूवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी राठोंडाचा राजीनामा मंजूर केला. त्या क्षणापासून वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाली असून या नेत्यांची नावे समोर येत आहेत.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -