घरताज्या घडामोडी'नाईट लाइफ' योजनेला ७ वर्षांनी मिळाली परवानगी

‘नाईट लाइफ’ योजनेला ७ वर्षांनी मिळाली परवानगी

Subscribe

'नाईट लाइफ' योजनेला ७ वर्षांनी परवानगी मिळाली असून या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली आहे.

मुंबईमधील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्ज २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी २०१३ साली मांडला होता. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची अखेर मंजुरी मिळाली आहे. तब्बल ७ वर्षांनी ‘मुंबई २४ तास’ योजनेला अखेर मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मॉल आणि मिल कंपाऊंड उघडे राहणार आहे. तर रहिवासी भागातील दुकाने बंद राहतील, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

‘एखाद्या वेळेस रात्री कोणाला जेवायचे असेल तर त्या व्यक्तीला पंचतारांकित हॉटेल्समध्ये जावे लागते आणि म्हणूनच मी ‘नाईट लाइफ’चा प्रस्ताव २०१३ साली मांडला होता. कारण मुंबई कधीच झोपत नाही. मुंबई हे २४ तास काम करणारे शहर आहे. कारण या मुंबई शहरात पत्रकार, राजकारणी आणि अशी अनेक मंडळी आहेत. जी २४ तास काम करतात. त्यांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. मात्र, अशावेळी जर त्यांना भूक लागली तर जायचे कुठे असा प्रश्न असतो आणि त्यामुळेच हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईत आपण पाहतो की, महिला असो किंवा पुरुष अगदी सुरक्षित रित्या फिरत असतात. तसेच या निर्णयामुळे रोजगार निर्मिती आणि महसूल वाढण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाइफ म्हणजे केवळ पब आणि बार इतकेच नाही. तर बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकाने सुरू ठेवणे बंधनकारक नाही. हे प्रत्येकावर अवलंबून असेल,’ असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.


हेही वाचा – शिवभोजनासाठी आधारकार्डाची गरज नाही – भुजबळ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -