घरताज्या घडामोडीChicken, Egg Price Hike: श्रावण संपताच चिकन, अंड्याचे भाव कडाडले

Chicken, Egg Price Hike: श्रावण संपताच चिकन, अंड्याचे भाव कडाडले

Subscribe

मासांहारी लोकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्रावण महिना अन् गणेश उत्सव संपताच चिकन आणि अंड्याचा दरात वाढ झाली आहे. श्रावण आणि गणेशोत्सवात असलेलेल्या दराच्या तुलनेत चिकन प्रति किलो १० रुपयांनी आणि अंड एक रुपयाने महागले आहे. त्यामुळे श्रावण आणि गणेशोत्सव संपताच मासांहारच्या सेवनाकडे वळलेल्यांना चिकन, अंड्यांसाठी काही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या महिन्याभरापासून श्रावण महिना आणि गणेशोत्सव असल्यामुळे अनेक जण मासांहारी खात नव्हते. गणेशोत्सव संपताच अनेक जण मासांहार सेवनाकडे वळले आहेत. मात्र दोन ते तीन दिवसांतच चिकन आणि अंड्याचे दर वाढले आहेत. सर्वसाधारणपणे चिकन आणि अंड्याचे दर मटण आणि मासळीच्या दरातच्या तुलनेत कमी असतात. त्यामुळे चिकन आणि अंड्याची मागणी जास्त आहे. पण श्रावणमास आणि गणेशोत्सव संपताच दोन ते तीन दिवसांत चिकन, अंड्याचे दर वधारले आहेत.

- Advertisement -

श्रावणमास आणि गणेशोत्सवाच्या दिवसात ब्रॉयलर कोंबडी प्रतिकिलो १४० रुपये, गावठी कोंबडी प्रति किलो २३० होते. मात्र आता ब्रॉयलर कोंबडी प्रति किलो १५० आणि गावठी कोंबडी प्रति किलो २४० रुपये झाले आहे. तर अंडी गेल्या महिन्यात प्रति नग पाच रुपये होते, त्यात एक रुपयांची भर पडून सात रुपये प्रति नग झाले आहे.

दरम्यान कोरोनाच्या काळात संसर्ग होण्याच्या भीतीपोटी चिकन आणि अंडी खाणे कमी झाले होते. यामुळे मागणी घटल्याने अनेकांना पोल्ट्रीला टाळे लावावे लागले. यामुळे चिकन, अंड्याचा आवक कमी झाला आहे. जरी आता याची मागणी वाढली तरी त्या तुलनेमध्ये याचा पुरेसा साठा होणे अशक्य असल्यामुळे चिकन, अंड्याच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोंबडी विक्रेत्याने दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona : मुंबईकरांनो कोरोना अजून संपलेला नाही, पुढील १५ दिवस महत्त्वाचे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -