घरताज्या घडामोडीलेखिकेच्या २० तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर, अखेर मुजोर ज्वेलर्सने मराठीत मागितली माफी

लेखिकेच्या २० तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर, अखेर मुजोर ज्वेलर्सने मराठीत मागितली माफी

Subscribe

कुलाब्यातील एका मुजोर महावीर ज्वेलर्सने मराठीत बोलण्यास नकार देत मराठी लेखिका शोभा देशपांडे यांना दुकानातून ढकलून दिले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी मराठीच्या अस्मितेसाठी लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानासमोरच ठिय्या आंदोलन केले. रात्रभर दुकानासमोर आंदोलनाला एकट्या बसलेल्या शोभा देशपांडे यांच्या मदतीला शुक्रवारी सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे हे कार्यकर्त्यांसह धावून आले. अखेर या मुजोर ज्वेअर्सने मनसेच्या दणक्यानंतर लेखिका शोभा देशपांडे यांची पाय पकडून मराठीत बोलून माफी मागितली आहे. आता शोभा देशपांडे यांना पोलीस औषधोपचारांसाठी रुग्णालयात घेऊन गेले आहे.

रात्रभर करत असलेल्या शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाला यश आले आहे. ज्वेलर्स जेव्हा घटनास्थळी दाखल झाला तेव्हा त्याला लोकांच्या रोषाला सामोर जावे लागेल. त्यावेळेस ज्वेलर्सला काही लोकांनी मारहाण देखील केली. माध्यमांशी बोलताना ज्वेअर्सचा मालक म्हणाला की, मला मराठी थोडे येते. मुंबईतच माझा जन्म झाला आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. मला माफ करा, असं म्हणतं त्यांने शोभा देशापांडे यांची पाय पकडून माफी मागितली आहे.

- Advertisement -

गुरुवार पासून शोभा देशपांडे यांनी दुकानाच्या बाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. रात्रभर आपल्या मागण्यावर ठाम राहून त्यांनी मराठी भाषा बोलण्याचा आग्रह धरला होता. पण हा मुजोर ज्वेलर्स दुकान बंद करून निघून गेला होता. तरी रात्रभर शोभा देशापांडे यांनी त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू ठेवलं. एवढं सगळं होऊनही आज सकाळी ११ वाजेपर्यंत ज्वेलर्स आंदोलनस्थळी यायला तयार नव्हता किंवा प्रतिक्रिया द्यायला तयार नव्हता. २० तासांपासून शोभा देशपांडे एक पाण्याची बॉटल आणि चार मराठीची पुस्तके घेऊन आंदोलन करत होत्या. त्यानंतर त्यांच्या या ठाम भूमिकेनंतर प्रशासानाने त्यांची दखल घेतली. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मग पोलीस ज्वेलर्सच्या मालकाला आंदोलनस्थळी घेऊ आले. तेव्हा मुजोर ज्वेअर्सच्या मालकाने शोभा देशपांडे यांची मराठीत माफी मागितली.


हेही वाचा – पत्रकारांसह दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना लोकल प्रवासाची मुभा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -