घरमुंबईपुरग्रस्तानंतर आता शाळांची सरकारकडून थट्टा

पुरग्रस्तानंतर आता शाळांची सरकारकडून थट्टा

Subscribe

अवघ्या काही तासातच माहिती देण्याचे फर्मान ,

मुंबई व उपनगरात गतआठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे शाळांमध्येही पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. म्हणून शाळांच्या झालेल्या नुकसानीची माहिती शिक्षण निरीक्षकांनी मुखाध्यापकांकडून मागवली आहे. मात्र ही माहिती मागवतानाही शिक्षण विभागाने शनिवारी परिपत्रक काढून सायंकाळी 7 वाजेपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

मागील आठवड्यात राज्यातील इतर भागांप्रमाणे मुंबईतही अतिवृष्टी झाल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पावसाचा जोर इतका जास्त होता की यामध्ये काही शाळांचे नुकसान झाल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्व अनुदानित/विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकडून अशा नुकसानीची माहिती गोळा करून देण्याचे निर्देश शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना शनिवारी दिले. मात्र ही माहिती गोळा कारण्यासाठी त्यांना अवघ्या काही तासांचा कालावधी दिला. या वेळेत जर शाळांचे नुकसान झाले असेल तर माहिती विस्तृत रूपात कशी द्यावी, असा प्रश्न मुख्याध्यापकांपुढे उभा राहिला. प्रपत्रात जरी नुकसानीचा प्रकार आणि त्यासाठी आवश्यक दुरुस्तीसाठी अनुदानाची रक्कम भरायची असली तरी जुजबी माहिती गोळा करून देणे आवश्यक असल्याचे मत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. त्यामुळे इतक्या कमी वेळात माहिती कशी द्यावी, हा पेच मुख्याध्यापकांपुढे उभा राहिला आहे.

- Advertisement -

यासाठी गुगल फॉर्मची एक लिंकही तयार करण्यात आली आहे. या शिवाय माहिती दिल्यानंतर ती मदत मिळेल की नाही याबाबतही मुख्याध्यापकांनी सवाल उपस्थित केला आहे. माहिती मागवली जाते मात्र शासन काही मदत देत नाही. मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजीच्या पुरात झोपडपट्टीतील अनेक शाळांचे नुकसान झाले. शिक्षण विभागाने माहिती दिली, मात्र काहीच मदत आजतागायत सरकारने केली नाही.
– प्रशांत रेडीज, सचिव, मुख्याध्यापक संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -