वेदांता प्रकल्प गुजरातला तर, मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध कंपनीचे ऑफिस गेले कर्नाटकात; नागरिक संतप्त

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध करणारा वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला. अशातच आता 'फोन-पे' या प्रसिद्ध आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपनीचे मुंबई ऑफिस कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध करणारा वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला. अशातच आता ‘फोन-पे’ या प्रसिद्ध आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपनीचे मुंबई ऑफिस कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान वेदांता गुजरातला आणि फोन-पे कर्नाटकात जात असल्याने राज्यात राजकीय वादंग पेटले असून, आता त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. (after Vedanta phone pay company will shift Mumbai office in Karnataka decision of company)

फोनपे कंपनीने राज्यातील एका मराठी वृत्तपत्रकात पत्रक जारी करत माहिती दिली आहे. फोनपे कंपनीने घेतलेल्या या निर्णयावर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय, अनेकांनी कंपनीचा हा निर्णय चुकल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच एयर इंडियाचे मुख्य कार्यालय गुजरातमध्ये हलवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, फोन-पेचे अंधेरीत मुख्य कार्यालय कर्नाटकात हलवण्यासाठी कंपनीच्या मेमोरेन्डम ऑफ असोसिएशनने एक बैठक घेतली. ज्यामध्ये मुंबईतील ऑफिस महाराष्ट्राबाहेर म्हणजे कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा प्रस्ताव आता केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्याता आला आहे. तसेच, केंद्रा या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर फोनपेचे मुख्य कार्यालय मुंबईतून कर्नाटकात शिफ्ट केले जाणार आहे.

दरम्यान, “वेदांता प्रकल्पाबाबत खूप चर्चा झाली, शेवटपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा याकरता प्रयत्न सुरू होते. पण सध्या कारण नसताना संभ्रामवस्था निर्माण केली जातेय. पैशांची मागणी केल्याचा आरोप केला जातोय. ज्यांनी असा आरोप केला आहे, त्यांच्या हातात सर्व यंत्रणा आहेत. त्यांनी चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल”, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले.


हेही वाचा – उद्धव ठाकरे खोटारडे अन् लबाड लांडगा; नारायण राणेंचे जोरदार टीकास्त्र