घरCORONA UPDATEवाधवाननंतर आता आमदाराच्या कुटुंबीयांचाही विशेष परवानगीने प्रवास!

वाधवाननंतर आता आमदाराच्या कुटुंबीयांचाही विशेष परवानगीने प्रवास!

Subscribe

एकीकडे वाधवान बंधूंसह त्यांच्या कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्याची विशेष परवानगी देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता तशाच प्रकारचं आणखीन एक प्रकरण समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या कुटुंबीयांना ८ एप्रिल रोजी पुणे ते मुंबई आणि नंतर पुन्हा पुणे असा प्रवास करण्याची विशेष परवानगी पोलिसांकडून देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यासाठी पोलीस अधिकारी संदेश शिर्के यांच्या परवानगीचं पत्र देण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य घरातच बसले असताना बड्या लोकांना मात्र त्यांच्या इच्छित ठिकाणी प्रवासाची परवानगी मिळत असल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

कसा झाला प्रवास?

अनिल भोसले यांचे बंधू नितीन भोसले यांना पुण्याहून मुंबईला वांद्रे परिसरात जायचं होतं. तिथे त्यांचे कुटुंबीय राहातात. त्यामुळे पोलिसांकडून मिळालेल्या परवानगी पत्राच्या मदतीने नितीन भोसले हे ८ एप्रिलला पुण्याच्या शिवाजी नगरच्या रेंज हिल्स भागातून मुंबईच्या वांद्रे परिसरात गेले. तिथून त्यांच्या नातेवाईकांना घेऊन पुन्हा पुण्याला परतले. विशेष म्हणजे, या प्रवासामध्ये त्यांना गाडीसाठी पेट्रेल लागल्यास तेही भरू दिलं जावं, अशी परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

शिवाजी भोसले बँक घोटाळ्याप्रकरणी सध्या अनिल भोसले हे पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

या परवानगी पत्रावर मी सही केलेली नाही. माझ्या डिजिटल सहीचा कुणीतरी गैरवापर केला आहे. ज्यानी कुणी तसं केलं असेल, त्याची चौकशी करून नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.

संदेश शिर्के, प्रांत पोलीस अधिकारी

कशासाठी देण्यात आली परवानगी?

दरम्यान, अनिल भोसले यांना कोणत्या कारणासाठी ही परवानगी देण्यात आली? त्यांच्या नातेवाईकांना मुंबईहून पुण्याला आणण्याची काय इमर्जन्सी होती? याविषयी मात्र अधिक माहिती अजून मिळू शकलेली नाही. सरकारी नियमानुसार इमर्जन्सीच्या कारणासाठीच प्रवासासाठी परवानगी दिली जाते. अनिल भोसले यांची राजकीय ओळख जरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडली गेली असली, तरी त्यांची जवळीक मात्र भाजपसोबत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे वाधवान बंधूंनंतर अशा नव्या प्रकरणामुळे बंधनं फक्त सामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.


हेही वाचा – वाधवान प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई का?; मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची चर्चा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -