घरनवी मुंबईमुंबई आणि नवी मुंबईत कोरोना वाढला, राज्यात २५ कोविड रुग्णालये पुन्हा होणार...

मुंबई आणि नवी मुंबईत कोरोना वाढला, राज्यात २५ कोविड रुग्णालये पुन्हा होणार सुरू

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्याप्रमाणेच आता मुंबईपाठोपाठ नवी मुंबई शहरातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढत आहे.

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली असून कोरोनाच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. मुंबई आणि नवी मुंबई शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात जवळपास २५ कोरोना रूग्णालये पुन्हा एकदा सुरू केले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्याप्रमाणेच आता मुंबईपाठोपाठ नवी मुंबई शहरातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढत आहे. नवी मुंबईत गेल्या २४ तासांत ५० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं नवी मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या २२२वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांची संख्या ५० झाल्यानं नवी मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दिवसाला दोन हजाराच्या आसपास कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ऐरोली, वाशी आणि नेरूळ येथील महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी प्रत्येकी २० बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत २३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्याच कालावधीत ३१९ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळं मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजार ५९१वर पोहोचला आहे.

- Advertisement -

देशात चार दिवस काहीशी नियंत्रणात आलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात १० हजार ५४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तब्बल ३८ जणांचा मृत्यू झालाय. नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता ६३ हजारांवर गेली आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आता राज्यभरात कोरोना रूग्णालये पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी महाजन यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

सद्यस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये पाच हजारांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत, दोन हजारांहून अधिक व्हेंटिलेटर आणि आवश्यकता पडल्यास ऑक्सिजनचे ६२ एलएमओ टँक्स, ३७ पीएसए प्लांट कार्यरत आहे.

या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही महाजन यांनी दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -