घरमुंबईमहाराष्ट्रात पुन्हा लागणार लॉकडाऊन?, आज होणार महत्त्वाचा निर्णय - पवार

महाराष्ट्रात पुन्हा लागणार लॉकडाऊन?, आज होणार महत्त्वाचा निर्णय – पवार

Subscribe

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पावर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक

कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जवळपास अमरावतीत कुटूंबच्या-कुटूंबाला कोरोनाची लागण झाल्याचे पाहिले आहे. या परिस्थितीवर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो यावर मुख्यमंत्री यांनी आरोग्य विभागाचे सचिव डॉ.व्यास आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ शहरांसाठी काय निर्णय घ्यायचा? तीन शहरांसाठीच निर्णय घ्यायचा की ग्रामीण भागाबाबतही निर्णय घ्यायचा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागात काही ठीकाणी डॉक्टरांच्या पाहणी केली आहे. तिथेही कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२.३० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कोरोना निर्बंधाविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल. अकोला, अमरावती आणि यवतमाळ शहरात पुन्हा लॉकडाऊन करायचा यावर बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. कोरोना परिस्थितत लग्नसमारंभापेक्षा नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे कोरोना नियमांत शिथिलता देण्यात आली होती. सिनेमागृहे पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले. रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. परंतु नागिरकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा उद्रेक होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणि लॉकडाऊन करायाचा का यावर निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना टाळण्यासाठी जी खबरदारी घ्यायची गरज असेल ती खबरदारी राज्य सरकारद्वारे घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -