ऐश्वर्या रायने जेव्हा एकाच दृश्यासाठी दोन हिरोंबरोबर केलं होतं शूट, व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्याने वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्यांबरोबरही तो शूट केला होता. यातलाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिगदर्शक मणिरत्नम यांचा रावण हा चित्रपट ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या फिल्मी करियरमधला मैलाचा दगड ठरला होता. २०१० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट वेगळ्याच धाटणीचा असल्याने हटके ठरला होता. रावण एकाच दिवशी हिंदी व तमिळ भाषेत प्रदर्शित झाला होता. एवढचं नाही तर ऐश्वर्याने वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्यांबरोबरही तो शूट केला होता. यातलाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Goosebumps Films (@goosebumpsfilms)

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या एकाच दृश्यात पृश्वीराज सुकुमारन आणि विक्रमबरोबर दिसत आहे. रामायणाने प्रेरित असलेल्या तमिळ भाषेतील चित्रपटात पृथ्वीराज याने राम तर विक्रमने रावणाने प्रेरित भूमिका केली होती. तर हिंदीमध्ये विक्रमने रामाची भूमिका केली आणि अभिषेक बच्चनची भूमिका रावणाने प्रेरित होती. पण दोन्ही चित्रपटात ऐश्वर्याने सीतेची भूमिका केली होती. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला असला तरी त्याच्या एडीटींग व फिल्मिंगची मात्र चर्चा होती. पण त्यातील काही दृश्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने रावण पुन्हा चर्चेत आला आहे.