घरमुंबईपरदेशी चलनाची तस्करी करणाऱ्याला मुंबईत अटक

परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्याला मुंबईत अटक

Subscribe

परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे. परकीय चलन दुबईला घेऊन जात असताना पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन त्याला अटक केली.

परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या आरोपीला मुबई विमानतळावर एआययूच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. भुपेंदर सिंग असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल १ लाख ४८ हजार ५०० अमेरिकन डॉलर हस्तगत केली आहे.

- Advertisement -

आरोपी भुपेंदर सिंग हा ४ जुलै रोजी जेट एअरवेजच्या विमानाने दुबईला जाण्यासाठी निघाला होका. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एआययूच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. दरम्यान त्याच्याकडून तब्बल १ कोटी ८ लाख ९०० रुपये भारतीय मूल्य असलेली रक्कम कपड्यात गुंडालेल्या कार्डबोर्ड रोलमध्ये आढळून आली. एआययूच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील पैसे ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी फेमा कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसंच या आरोपीने या आगोदर किती वेळा अशाप्रकारे तस्करी केली आहे याचा अधिक तपास सुरू आहे. मुंबई विमानतळावर या आधीही अशाप्रकारे तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात आले असून भूपेंदर सिंग याने सुद्धा या आधी अशी कामे केल्याचा पोलिसांना संशय आहे. या संदर्भात पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -