घरCORONA UPDATEअजय देवगण आणि अमेरिकअर्सची धारावीकरांना अशीही मदत

अजय देवगण आणि अमेरिकअर्सची धारावीकरांना अशीही मदत

Subscribe

मुंबई महापालिकेच्यावतीने कोरोना उपचार केंद्रांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासह इतरही आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत.

धारावी परिसरातील जनतेसाठी कार्यान्वित करण्यात आलेले महाराष्ट्र निसर्गोद्यानातील कोरोना आरोग्य केंद्र. २०० ऑक्सिजन बेड क्षमतेच्या या कोरोना केंद्रामुळे दादर, माहि‍म, धारावीसह जी/उत्तर विभागातील जनतेसाठी मोठे समर्पित आरोग्य केंद्र ठरणार आहे. चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचे एनवाय फाऊंडेशन आणि आपत्ती व्यवस्थापनासह आरोग्य क्षेत्रातील जगविख्यात अमेरिकेअर्स यांनी या केंद्रातील ऑक्सिजन सुविधेसाठी सहाय्य पुरवले आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने कोरोना उपचार केंद्रांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासह इतरही आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत. याअंतर्गत धारावी परिसरातील संसर्गाला रोखण्यासाठी संस्थात्मक अलगीकरण  अर्थात क्वांरटाईन सेंटर वाढवण्याच्या महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल सूचना केल्या होत्या. त्यानुसार कोरोना केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आणि अलगीकरणावर भर देण्यात आला. त्यामुळे  धारावीतील संसर्गाला रोखण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यासोबत आता ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले व परिपूर्ण सुविधांसह सुसज्ज असे महाराष्ट्र निसर्गोद्यान कोरोना आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर)  संजीव जयस्वाल यांनी सातत्याने भेटी देऊन हे केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे, यासाठी जी/उत्तर विभाग कार्यालयाला मार्गदर्शन केले आहे. जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांच्यासह विभाग कार्यालयाच्या विविध अधिकारी, कर्मचारी यांनी अथक प्रयत्नांतून हे सुसज्ज केंद्र उभारले आहे.

- Advertisement -

धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानसमोरील मोकळ्या जागेवर जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून २०० रुग्ण क्षमतेचे हे केंद्र कार्यान्वित झाले आहे. अंदाजे २२०० चौरस फूट क्षेत्रफळावर जलावरोधक (वॉटर प्रूफ) उभारण्यात आलेल्या या केंद्रामध्ये प्रत्येक रुग्‍णाच्‍या बेडला ऑक्सिजनचा पुरवठा आहे. मध्यम स्वरुपाची बाधा झालेल्या कोरोना बाधितांना त्याचा खासकरुन लाभ होणार आहे. प्रत्येक बेडसमवेत पंखे, प्रत्येक रुग्णाला त्यांचे वैयक्तिक साहित्य ठेवण्यासाठी कपाट तसेच स्वच्छ गादी, उशी, बेडशीट यांची काळजीपूर्वक व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक रुग्णासाठी गरम पाणी, सकाळी व सायंकाळी अल्पोपहार, दुपारी व रात्री जेवण यासह दूध आदी पोषक आहार पुरवला जातो आहे. तसेच रुग्णांची गरज लक्षात घेऊन औषधींचा पुरेसा साठादेखील उपलब्ध आहे.

रुग्णसेवेसाठी ३ सत्रांमध्ये १० डॉक्टर्स, १५ नर्स आणि तत्सम इतर कामे करण्यासाठी ७० वॉर्डबॉय नेमण्यात आले आहेत. तसेच मदतीसाठी ७० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या व सुरळीत होण्यासाठी पुरेसे सिलेंडर्स उपलब्ध असून त्याबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच या केंद्रासाठी स्वतंत्र व २४ तास उपलब्ध असणारी रुग्णवाहिकाही तैनात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -