अजिंक्य देव यांच्या घरी चोरी प्रकरणात मोलकरणीची ७ वर्षांनी निर्दोष मुक्तता

अंजिक्य देव यांच्या पत्नी आरती अजिंक्य देव यांनी १९ सप्टेंबर २०१४ रोजी यांच्या पाकिटातील ५ हजार रुपये आणि ७ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे सोने चोरी केल्याचा आरोप मोलकरणीवर केला.

ajinkya deo house theft case maid found not guilty
अजिंक्य देव यांच्या घरी चोरी प्रकरणात मोलकरणीची ७ वर्षांनी निर्दोष मुक्तता

अभिनेते अंजिक्य देव (Ajinkya Deo) यांच्या घरी चोरी प्रकरणात मोलकरणीची ७ वर्षांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (ajinkya deo house theft case maid found not guilty)  २०१४ साली अंजिक्य देव यांची पत्नी आरती देव ( Ajinkya Deo Wife arti Deo) यांनी पाकिटातील पैसे आणि सोने चोरी केल्याचा आरोप करत घरातील मोलकरीन कल्पना हरिश्चंद्र गवारी (Kalpana Harishchandra Gawari) हिच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा खटला अंधेरी कोर्टात सुरू होता. आज या खटल्यावर अंधेरी कोर्टाकडून अंतिम निर्णय देण्यात आला ज्यात आरोपी मोलकरीण कल्पना हीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोप करणाऱ्या आरती अजिंक्य देव या आरोपी कल्पना हिच्या विरोधात पुरावे सादर करण्यात कमी पडल्याने तिची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली.

अंजिक्य देव यांच्या घरी २५ वर्षीय कल्पना गवारी ही मोलकरीण म्हणून काम करत होती. अंजिक्य देव यांच्या पत्नी आरती अजिंक्य देव यांनी १९ सप्टेंबर २०१४ रोजी यांच्या पाकिटातील ५ हजार रुपये आणि ७ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे सोने चोरी केल्याचा आरोप मोलकरणीवर केला. त्यानंतर आरती देव यांनी मोलकरीण कल्पना हिच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरती देव यांच्या तक्रारीनुसार, वर्सोवा पोलिसांनी मोलकरीण कल्पना हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपी कल्पना हिच्याकडून काही सोने जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपी कल्पना जामिनावर बाहेर आली.

या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आरती अजिंक्य देव यांनी आरोपी कल्पना हिला प्रत्यक्षात पाकिटातील पैसे आणि सोने चोरताना पाहिले नाही. तिने चोरी केल्याचा केवळ संशय असल्याचे त्यांनी सांगितले. आज तब्बल सात वर्षांनी या प्रकरणातून अरोपी कल्पना हिची निर्दोष सुटका झाली. आरोप करणाऱ्या आरती अजिंक्य देव या आरोपी कल्पना हिच्या विरोधात योग्य पुरावे सिद्ध करू न शकल्याने तिची निर्दोष मुक्तता करत असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – ‘जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू’, अफगाणिस्तान-तालिबान संघर्षावर कंगनाची प्रतिक्रिया