झाकली मूठ सव्वालाखाची असते, ती प्रत्येकाने झाकून ठेवावी – अजित पवार

Ajit Pawar criticized Nana Patole
Ajit Pawar criticized Nana Patole

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. नाना पटोलेंचे वक्तव्य हास्यास्पद आहे. यावेळी अजित पवार यांनी नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते, मग भाजपमध्ये गेले त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची असते, ती प्रत्येकाने झाकून ठेवावी, असा सल्ला अजित पवारांनी नाना पटोले यांना दिला.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्यावर खंजीर खुपसण्याचे आरोप केले. नानाचे आरोप हास्यपद आहेत, असे अजित पवार म्हणाले. नाना पटोले स्वतः आता भाजपमधून काँग्रेसमध्ये आले आहेत. हेडलाईन करण्यासाठी खंजीर वगैरे चांगले वाटत असेल, असे म्हणत अजित पवारांनी टोला नाना पटोलेंना टोला लगावला. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष काम करत आहेत. राज्य स्तरावर निर्णय राज्यातले लोके निर्णय घेतात. जिल्ह्याच्या पातळीवर वेगवेगळ्या गोष्टी घडतात. तिथल्या गोष्टी नीट राहण्यासाठी नेत्यांमध्ये समन्वय असण्याची गरज असल्याचे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसने काही काही ठिकाणी भाजपसोबत आघाडी केली आहे. मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही, असे म्हणत अजित पवारांनीही पलटवार केला आहे. जबाबदार नेत्यांनी जबाबदारीने बोलावे, आपल्या वक्तव्यांचा वेगळा अर्थ निघेल असे काही बोलू नये, असा सल्ला अजित पवारांनी नाना पटोलेंना दिला आहे. तीन्ही पक्षांना पक्ष वाढवण्याचा अधिकार असून पण तिघांना एकत्र राहूनच बहुमत मिळेल, असे ते म्हणाले.