घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या गैरहजेरीवर अजितदादांचा खुलासा म्हणाले, म्हणाले पाच वर्षे मुख्यमंत्री...

मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या गैरहजेरीवर अजितदादांचा खुलासा म्हणाले, म्हणाले पाच वर्षे मुख्यमंत्री…

Subscribe

विरोधकांच्या बहिष्कारानंतरही सत्ताधारी पक्षाचे चहापान सह्याद्री अतिगृह येथे पार पडले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाची सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेआधी राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर होते. या निमित्ताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यंत्र्यांच्या गैरहजेरीवर प्रश्न करण्यात आला. या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला. ते म्हणाले की छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर महाविकास आघाडीची आज बैठक आहे. या बैठकीला मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. त्याशिवाय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही मुख्यमंत्री व्हीसीद्वारे हजर होते. अनेक मुद्द्यांवर त्यांनी मंत्रीमंडळाला मार्गदर्शन केले असेही त्यांनी सांगितले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही मुख्यमंत्री हे १०० टक्के हजर राहणार अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

देशातील अनेक मोठे नेते… 

मुख्यमंत्री पत्रकार परिषदेला का हजर राहिले नाहीत ? या मुद्द्यावर बोलताना अजितदादा म्हणाले की, देशातील अनेक मोठ्या व्यक्ती मोठ्या पदावर बसलेल्या असताना पत्रकार परिषद घेत नाही. कारण पत्रकार परिषद घ्यावी की नाही हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे देशात असे अनेक मुख्यमंत्री आहे, ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे की त्यांनी पत्रकार परिषदेला हजर रहायचे की नाही.


विरोधकांच्या बहिष्कारापेक्षा गाजली मुख्यमंत्र्यांची चहापानासाठीची गैरहजेरी

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -