घरमुंबईवेळ पडली तर मुंबई मनपा बरखास्त करा, प्रशासक नेमा - अजित पवार

वेळ पडली तर मुंबई मनपा बरखास्त करा, प्रशासक नेमा – अजित पवार

Subscribe

मालाड भिंत दुर्घटना प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच, आवश्यकता पडल्यास मुंबई महानगर पालिका बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

‘२० वर्षापेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र सगळं काम व्यवस्थित सुरू आहे, असं सांगितलं जातंय. त्यामुळे महापौर, उपमहापौर चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. वेळ पडली तर प्रशासक आणा, मनपा बरखास्त करून टाका’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून त्यानंतर सोमवारी मध्यरात्री मालाडमध्ये एक संरक्षक भिंत कोसळल्यामुळे आत्तापर्यंत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. तसेच, मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे लोकल वाहतूक आणि रस्ते वाहतूक खोळंबली आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.


हेही वाचा – ‘मुंबई बुडवून दाखविली हे मान्य करून शिवसेनेने माफी मागावी’

‘याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची’

दरम्यान, ‘मुंबई तुंबल्यावर यांच्या कामाची पोलखोल होते. त्यामुळे याच्या खोलात जाऊन चौकशी व्हावी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाही’, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. ‘मनुष्याला एकदाच जन्म मिळतो. त्यामुळे किडया-मुंग्यांसारखं लोकं मरत असतील तर हे सरकारचे अपयश आहे. हा सरकारचा कमीपणा आहे. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, ही जबाबदारी सरकारने घ्यावी’, अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली.

- Advertisement -

‘मुंबई तुंबली हे यांना कसं कळणार?’

मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. लोकांचा जीव धोक्यात आलाय. लोकं जखमी झाले आहेत. त्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी करतानाच गेलेली व्यक्ती भरीव मदत दिल्यामुळे परत येत नाही. कर्ती व्यक्ती गेली की, घर आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होते. ती व्यक्ती परराज्यातील, परजिल्हयातील असो’, असेही अजितदादा पवार म्हणाले. ‘मुंबई ही तुमची माझी देशाची आर्थिक राजधानी पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईत पाणी तुंबले आहे आणि मुंबईचे प्रथम नागरीक मुंबई तुंबली नाही असं सांगत आहेत. काय केल्यावर मुंबई तुंबली हे यांना कळणार आहे?’ असा टोला देखील अजित पवार यांनी महापौरांना लगावला.


हेही वाचा – पावसामुळे आज अधिवेशनात आमदारही राहणार उपाशी!

मुंबईच्या मिठी नदीच्या मुद्द्यावर देखील अजित पवारांनी मुद्दे मांडले. ‘मिठी नदीसाठी केंद्राने आर्थिक मदत केली आहे आणि राज्यसरकार वेळोवेळी मदत करत आहे. असं असताना मिठी नदीचे काम का पूर्ण होत नाही?’ अशी विचारणा त्यांनी केली.

- Advertisement -

मनसेने साधला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर निशाणा

मनसेने साधला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर निशाणा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 2, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -