पाहुणे माझ्याकडे नव्हे आमच्या नातेवाईकांकडे आले होते, IT छापेमारीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

ajit pawar reaction on income tax department raid
पाहुणे माझ्याकडे नव्हे आमच्या नातेवाईकांकडे आले होते, IT छापेमारीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

पाहुणे माझ्याकडे नाही तर आमच्या नातेवाईकांकडे आले होते अशी मिश्किल प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार संबंधीत असलेल्या कारखाना संचालक, बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही छापेमारी करण्यात आली होती. यावर अजित पवारांनी पाहुणे गेल्यावर प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले होते. कायदा सगळ्यांना सारखाच आहे. आपली बाजू चोख असेल तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आयकर विभागाच्या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नवी मुंबईतील कामांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. पाहुणे गेले का असा प्रश्न अजित पवारांना विचारला असता त्यांनी म्हटलं आहे की, पाहुणे माझ्याकडे नव्हते आले आमच्या नातेवाईकांकडे आले होते. नातेवाईकांकडे आलेले पाहुणे काल का परवा गेले, पाहुणचार संपला असा प्रश्न केला असता अजित पवार यांनी म्हटलं आहे की, ते गेले आता पुढच्या गोष्टी नंतर सुरु होतात. आयटीची धाड पडल्यामुळे तुम्हाला माहिती नसेल आता ते पाठवतील, माहिती देतील त्यांना जे काही पाठवायचे ते पाठवतील, त्यांचे म्हणणे मांडतील ती थोडी मोठी प्रोसेस असल्याचे अजित पवारांनी म्हटलं आहे.

कर नाही त्याला डर कशाला

केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन अजित पवारांना प्रश्न केला होता. यावर ते म्हणाले मला त्याच्याबद्दल त्या त्या संस्थांवर असलेली जबाबदारी पार पाडावी. आपण सर्व देशाचे नागरिक आहोत सगळ्यांना नियम सारखे असतात. त्या पद्धतीने आपली बाजू चोख असेल तर कर नाही त्याला डर कशाला असे अजित पवारांनी म्हटलं आहे.

हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

भाजपमध्ये आल्यापासून निवांत झोप लागते, कसली कारवाई नाही असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी लगेच दुसरे वक्तव्य केलं माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता तसा नव्हता उलट माझ्यापेक्षा त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय निघतो याचा अर्थ पत्रकारांना चांगले माहिते असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. मला वाटतं की, अमक्याला आमकं आणि तमक्याला तमकं म्हणण्यापेक्षा विकास कामांच्या संदर्भात बोलायचं मी कधीही अशा गोष्टीला लक्ष देत नाही माझा तो स्वभाव नाही माझं आपलं काम भलं आणि आपण भले असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात वीजेची चिंता नाही

राज्यात काही दिवसांपुर्वी २ ते ३ दिवसांचा कोळसा राज्यात शिल्लक होता. राज्यमंत्रिमंडळ बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली की, आता कोळशाचा तुटवड्याचा प्रश्न मिटला आहे. आपल्याकडे कोळशाचा साठा आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. आता दसरा आहे. नंतर दिवाळी, ख्रिसमस असे मोठे सण आहेत. त्यावेळी वीजेवर काही परिणाम होणार नाही असे ऊर्जाविभागकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे काहीही चिंता करण्याचे कारण नाही असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : MHADA Konkan Lottery 2021: ८ हजार ९८४ घरांची सोडत पार; काही ठिकाणी हसू, काही ठिकाणी आसू