घरमुंबईदादांचा मीडियाला चकवा

दादांचा मीडियाला चकवा

Subscribe

बारामतीला जाण्याचे सोडून अज्ञातस्थळी बैठकीला गेले

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोर-बैठका सुरू असताना बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिनसले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची गुरुवारची बैठक अचानक रद्द झाली. रात्री आठ वाजता अजित पवार बैठकीतून बाहेर पडले. ते रागावलेले दिसत होते. पत्रकारांनी बैठकीबद्दल विचारले असता काहीशा रागातच अजित पवार यांनी ‘नो कॉमेंट’ असे शब्द उच्चारत ते गाडीत जाऊन बसले. मी बारामतीला जातोय, असे सांगत ते गाडीतून त्वरीत निघूनही गेले. मात्र रात्री उशीरा अज्ञातस्थळी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक झाली.

शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात ही बैठक नियोजित होती.ही बैठक रद्द का झाली याबाबतची मला माहिती नाही. मी बारामतीला जात आहे. नो कमेंट, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिल्ली. किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत पहिलीच भेट होणार होती. मात्र, तीच रद्द झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. बैठक ऐनवेळी रद्द करण्यामागील नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, अजित पवार नाराज दिसत होते. या नाराजीमागे काय कारण, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नाते बिघडले आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. काँग्रेसकडून या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते येणार नाहीत हे कळल्यावर तेही बैठकीतून निघून गेले.मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, नवाब मलिका निघाले होते. मात्र अजित पवार तातडीने निघून गेल्यावर हे नेतेही माघारी फिरले.

- Advertisement -

आमच्यात बिनसले नाही -अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना बैठकीबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, बैठक रद्द झाल्याची अधिकृत माहिती मला मिळालेली नाही. त्यामुळे मी दुजोरा देऊ शकत नाही. काँग्रेसची अंतर्गत चर्चा होती, ती प्राथमिक चर्चा झाली. बैठकीबाबत काही माहिती आल्यास ती देईन, असे अशोक चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीकडून अद्याप बैठकीचा निरोप नाही. काँग्रेसची प्राथमिक चर्चा झाली. राष्ट्रवादीकडून चर्चेचा निरोप आला तर जाऊ. आमच्यात कुठलाही वाद नाही. बैठक व्हावी अशी चर्चा होत होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या कुठलाही निरोप आलेला नाही. दोन्ही पक्षात चांगला समन्वय आहे. शिवसेनेशी चर्चा करण्याचा प्रयत्न आहे, ते काय असेल ते कळवतील, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

तटकरेंचे कानावर हात
बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी कानावर हात ठेवले. मी दिल्लीत सोमवारपासून जे अधिवेशन होणार आहे तेथे कोणती भूमिका घ्यायची यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. मी बैठकीत शेवटी सहभागी झालो. त्यामुळे मला काही कल्पना नाही. प्रादेशिक पातळीवरील बैठका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि इतर नेते यांच्यात होणार असेल तर याची मला कल्पना नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.

- Advertisement -

अजित चेष्टेने बोलले असतील -शरद पवार
अजित पवार हे मुंबईतच आहेत. उद्या ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील आणि प्रसारमाध्यमांनाही सामोरे जातील. त्यांनी चेष्टेने ती गोष्टी सांगितली असेल. नाहीतर तुमच्या गाड्या लगेचच मागे लागतात. माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते चेष्टेत बोलले असतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -