घरआतल्या बातम्याअजोय मेहता साहेबांची पाटी काढली!

अजोय मेहता साहेबांची पाटी काढली!

Subscribe

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांची महारेराच्या अध्यक्षपदी ११ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर तीन महिने झाले असतानाही मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील त्यांचे दालन आणि त्याबाहेरील त्यांच्या नावाची पाटी कायम होती.

ते छायाचित्र दै. आपलं महानगरने गुरुवार, १३ मे रोजीच्या अंकात पहिल्या पानावर प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ठाकरे सरकारला जाग आली आणि सहाव्या मजल्यावरील ‘त्या’ दालनाबाहेरील अजोय मेहता यांच्या नावाची प्रधान सल्लागार पदाची पाटी मंगळवारी काढून टाकण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -