Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Video : एक सफर, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची, काय आहेत वैशिष्ट्ये ?

Video : एक सफर, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची, काय आहेत वैशिष्ट्ये ?

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज बुधवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपुर्ण स्मारकाच स्वरूप कसे असणार आहे तसेच या स्मारकाच काम कशा स्वरूपाने चालणार आहे याचेही सादरीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले. या स्मारकाच्या वैशिष्ट्यांमध्ये बाळासाहेबांचा संपुर्ण राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक प्रवास उलगडून दाखवणाऱ्या चित्रांपासून ते व्हिडिओ आणि व्हर्च्यूअल रिएलिटीच्या तंत्रज्ञानाची पर्वणी ही स्मारक पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी असणार आहे. तसेच शिवसेनेच्या पहिल्या नगरसेवकापासून ते पहिला मुख्यमंत्री त्यासोबतच शिवसेनेचे आणि हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान हा सगळा प्रवास या स्मारकाच्या निमित्ताने पर्यटकांसाठी एक सुखावणारा असाच अनुभव असणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची एक झलक | Balasaheb thackeray national memorial

हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे आज भूमिपूजन करण्यात आले. जुन्या महापौर निवासस्थानी बाळासाहेबांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले मात्र, बऱ्याच जणांना उत्सुकता आहे ती हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक कसे असणार? पहा त्याची एक झलक.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, March 31, 2021

- Advertisement -

 

कसे असेल बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ? 

मुंबईच्या मध्यवर्ती प्रभागात आणि शिवतिर्थाच्या शेजारीच हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक वसणार आहे. या स्मारकाच्या प्रवेश द्वारातच देखणा असा स्वागत कक्ष प्रसन्न वदने स्वागत करणार आहे. माझ्या जमलेल्या तमाम बंधू भगीणी आणि मातांनो या बाळासाहेबांच्या भाषणाच्या सुरूवातीच्या सादेची आपुलकीची आठवण करून दिल्याशिवाय हा स्वागतकक्ष राहणार नाही.

- Advertisement -

स्मारकात प्रवेश केल्यानंतर भव्य दिव्य असा वास्तुचा परिसर प्रसन्न असा करणारा आहे. भव्यदिव्य वास्तूमध्ये असलेले भव्यदिव्य अस पाण्याच कुंड हे लक्ष वेधून घेते. शरीराराची आणि मनाची शांती मिळवून देणारे असे हे कुंड आहे. वास्तु ही बाळासाहेबांच्या प्रगल्भ व्यक्तीमत्वाच्या विचारांनी परिपुर्ण असलेली अशी आहे. त्यांची प्रतिमाच समोर असल्याचे भासवते. समोर उभे राहून बाळासाहेब आपल्याशी संवाद साधत आहेत अस वाटून जाते.

त्यानंतर वास्तूच्या तळघरात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर जस सकारात्मक आणि शक्तीपिठाच वलय अनुभवतो, तोच अनुभव इथे यायला सुरूवात होते. तमाम मराठी साम्राज्याचा समृद्ध असा गाभाराच असावा अशीच अनुभुती याठिकाणी येते.

बाळासाहेबांच्या शब्दांना धार देणारा त्यांचा कुंचल्याचा फटकारा कायमच प्रभावी ठरला. फ्री प्रेसमध्ये काम करणारे कार्टूनिस्ट वाईट प्रवृत्तींचा कर्दनकाळ ठरले तेच बाळासाहेब त्यांच्या विविध छटांमधून इथे दिसणार आहेत. जुन्या आणि चिरतरूण तसबिरीतून त्यांच्या प्रवासाची दालन याठिकाणी साद देतील. काही चित्रफिती काही भास निर्माण करणारी व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे दिसणारे प्रसंग तसेच बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाला विषद करणाऱ्या चित्रफिती पर्यटकांना वेगळ्या विश्वात घेऊन जातील. समुद्र किनारा हा भव्य वास्तूसंग्रहलायची भव्यता विषद करेल.

बाळासाहेबांची कौटुंबिक जडणघडण आणि समाजप्रबोधनातून राजकीय वाटचालीस केलेला प्रवास त्या प्रवासाच सचित्र दर्शन इथे घडणार आहे. बाळासाहेबांना संघटनेच नाव प्रबोधनकारांनी बहाल केले. महाराष्ट्राच्या जडणघडणेत बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे योगदान स्वतंत्र ठसा उमटवणारे असे आहे. मराठी माणसाच्या मूलभूत हक्कासाठी बाळासाहेबांनी जंगजंग पछाडलं. आपला आवाज उठवला आणि बघता बघता तो आवाज घराघरातला लोकप्रिय आवाज ठरला. त्यांची जडणघडण आणि राजकीय पातळीवरची महत्व या दालनातून अनुभवता येईल.

शिवसेनेचा पहिला नगरसेवक, पहिला महापौर, आमदार, खासदार ते शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री असा झंझावाती प्रवास याठिकाणी पहायला मिळतो. या सगळ्या प्रवासात शहराची, राज्याची आणि देशाची भरभराट व्हावी असा उद्देश होता. गरजूंना न्याय मिळवून द्यावा, गुन्हेगारांना वचक बसावा, कला, संस्कृती आणि साहित्य अस ध्येय आयुष्यभर आपल्या ह्दयात साठवून ठेवणारा हा सम्राट होता. म्हणूनच या सम्राटाला हिंदू ह्दय सम्राट अशी उपाधी मिळाली. या महापौर बंगल्याच्या राजकीय व्यक्तीच नाही तर सर्वसामान्यांनाही प्रवेश मानानं मिळावा हाच संग्रहालय करण्यामागचा उद्देश आहे. याचच दर्शन हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या प्रवासातही दिसल, त्या आठवणींचा कक्ष हा आणखी गर्भश्रीमंत आणि भावनासमृद्ध करणारा असा आहे.

संग्रहाच्या दालनातून बाहेर आल्यानंतर मागील बाजूस असणारा अथांग समुद्र तुम्हाला पुनश्च तुम्हाला बाळासाहेबांच्या विशाल व्यक्तीमत्वाचा प्रत्यय देतो. बाहेर आल्यानंतर कॅफेटेरिया संपुर्ण संग्रहलायच भव्य रूप अनुभवण्याची संधी देतात. या बुलंद व्यक्तीमत्वाच्या आयुष्यपटाचा अनुभव तुम्ही ह्दयात साठवून बाहेर पडता. हेच खर राष्ट्रीय स्मारकाच खर वैशिष्ट्य आहे.


 

 

 

 

 

 

 

 

- Advertisement -