घरमुंबईसर्वच इमारती कोसळणार, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

सर्वच इमारती कोसळणार, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

Subscribe

डोंगरी भागातील केसरबाई ही इमारत कोसळल्यानंतर या परिसरातील लोकं दहशतीखाली राहत असून या सर्वच इमारती कोसळण्याच्या परिस्थित आहेत.

मुंबईच्या डोंगरी भागातील केसरबाई ही इमारत कोसळल्यानंतर या परिसरातील लोकं दहशतीखाली आहेत. इथल्या सर्वच जुन्या इमारती पडू शकतील अशी भीती इथल्या नागरिकांना वाटते. त्यामुळे, या इमारती पाडून आम्हाला लवकरच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करा अशी अपेक्षा इथले स्थानिक रहिवासी करतात. केसरबाई या इमारतीच्या बाजूला असलेल्या अश्रफी मंजिल या इमारतीत तळ मजल्यावर राहणाऱ्या सय्यद कासींबी या आणि त्यांचा संपूर्ण परिवार जीव मुठीत घेऊन घरात वावरत आहे. लँडलॉर्डला अनेकदा सांगूनही इमारतीचं बांधकाम चांगलं आहे. कधीच पडणार नाही असं सांगून वेळ मारली जाते. त्यामुळे, इथले रहिवासी सध्या भीतीच्या वातावरणात वावरत असून जाणार कुठे? असाच प्रश्न ते विचारत आहेत.


हेही वाचा – डोंगरीतली ती इमारत म्हाडाचीच, प्रॉपर्टी कार्डवर नाव सापडलं!

- Advertisement -

या इमारतीच्या लँडलॉर्डचं नाव अश्रफ लाला असून ७० वर्षांपूर्वीची ही इमारत आहे. या इमारतीला आतून आणि बाहेरुन तडे गेले आहेत. त्यामुळे, या चिंचोळ्या गल्लीतील इमारती कधीही पडू शकतील असं रहिवाशांचं म्हणणं आहे.

‘मी दरवाजाबाहेर उभे होते. मला वाटलं पत्रे हलतायत. पण, इमारत दोन मिनिटांत खाली कोसळली. वॉशरुम वापरातानाही भीती वाटते. घरात नेहमी पाणी पडत असतं. पण, इथले नागरिक घाबरुन पुढाकार घेत नाहीत’.  – सय्यद कासींबी, रहिवाशी

- Advertisement -

या घटनेत एकूण २२ जण जखमी झाले आहेत. त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला असून ७ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तर, दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


हेही वाचा – ‘धोकादायक इमारतींचा क्लस्टर पद्धतीने पुनर्विकास करणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -