Eco friendly bappa Competition
घर ठाणे भातसा धरणाचे पाचही दरवाजे 0.50 मीटरने उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भातसा धरणाचे पाचही दरवाजे 0.50 मीटरने उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Subscribe

भातसा नदीच्या तिरावरील शहापूर - मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव नदीकाठावरील इतर गावांना सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या भातसा नगरच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिला आहे.

ठाणे: भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करण्याकरिता भातसा धरणाचे पाचही वक्रद्वारे 0.50 मी. ने उघडण्यात आले असून, 272.27 क्यूसेस एवढा पाण्याचा विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे. त्यामुळे भातसा नदीच्या तिरावरील शहापूर – मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव नदीकाठावरील इतर गावांना सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या भातसा नगरच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिला आहे.(All five gates of Bhatsa Dam opened by 0.50 m Vigilance alert for riverside villages)

सोमवारी 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भातसा धरणाची पाणी पातळी 141.66 मी. एकूण जलसाठा 964.457 दलघमी व धरणातील साठ्याची टक्केवारी 98.80 टक्के आहे. भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करणेकरिता भातसा धरणाचे पाचही वक्रद्वारे 0.50 मी. ने उघडण्यात आले असून, 272.27 क्यूसेस एवढा पाण्याचा विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे. त्यामुळे भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर – मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, तसेच सापगाव नदीकाठावरील इतर गावांतील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या व वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आला आहेत. यासंबंधी नदी काठावरील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : पडळकरांच्या टीकेनंतर अजित पवार गट आक्रमक; मिटकरींकडून थेट कुXX म्हणून उल्लेख

मुंबईला पाणीपुरवठा करण्याची ‘भातसा’वर जबाबदारी

मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे. प्रतिदीन 2 हजार एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी 959 मीटर असून तळपायापासून उंची 89 मीटर आहे. तसेच एकूण जलसंचय 976 .10 दशलक्षघनमीटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र 388.50 चौरस किलोमीटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा 67 किलोमीटर आहे. तर डावा कालवा 50 किलोमीटर आहे. भातसाधरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राद्वारे 15 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली जाते.

- Advertisement -

- Advertisment -