घरमुंबईअखिल भारतीय नागरी सेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उभी राहिली - देवेंद्र फडणवीस

अखिल भारतीय नागरी सेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उभी राहिली – देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबई : आज नागरी सेवा दिनानिमित्त (Civil Service Day) मुंबईत आयोजित पारितोषिक वितरण व सत्कार समारंभात कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अखिल भारतीय नागरी सेवेचा प्रस्ताव ठेवला होता आणि त्यांच्या संकल्पनेतूनच ही सेवा उभी राहिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागरी सेवामध्ये उत्तम काम करणाऱ्याचा नेहमी सत्कार होत असतो. हा सत्कार करताना आपले कर्तव्य आपण बजावत असतो, पण कर्तव्य बजावत असताना कर्तव्याच्या पलीकडे अशाप्रकारचा विचार करून जेव्हा समाजाकरता आपण एखादी गोष्ट करतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने पुरस्कराकरता आपण पात्र असते. माझ्या एवढ्या वर्षाचा अनुभव आहे की, आपले अधिकारी कल्पकता त्या ठिकाणी वापरतात आणि त्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार करतात, अनेक वेळा नवीन कार्यपद्धती आणतात. ज्या कार्यपद्धतीमुळे आणि योजनामुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठ परिवर्तन होताना आपल्याला दिसतो. आपण सर्व लोक शासनाचा भाग आहोत आणि शासन प्रशासन हे खऱ्या अर्थाने सेवा देण्याकरता तयार करण्यात आलेली व्यवस्था आहे, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, ज्यावेळी भारताचे संविधान लिहिले जात होते, त्यावेळी संविधान सभेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, या देशाला एक प्रशासन एक सेवा असली पाहिजे. त्याचे हे नेहमी मत असायचे की, भारतामध्ये आपल्याला फेडरल संरचना ठेवली पाहिजे. यासाठी एक भक्कम केंद्र आणि एक मध्यवर्ती इमारत असली पाहिजे, ज्यात एक मध्यवर्ती सरकार असेल. या इमारतीच्या आजूबाजूला वेगवेगळ्या इमारतींमध्ये राज्याची सरकारे असतील. या सर्वांमध्ये समन्वय साधायचा असेल तर त्याकरता एक अखिल भारतीय नागरी सेवा असली पाहिजे आणि म्हणून आपल्या संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय नागरी सेवेचा प्रस्ताव ठेवला होता. जेणेकरून नागरी सेवेतले अधिकाऱ्यांना कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुठल्याही प्रकारे कोणावर अवलंबुन न राहता आपले कर्तव्य बजावू शकले पाहिजे. अशाप्रकारची व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उभी राहिली. आज जर मागे वळून पाहिले तर त्यावेळी त्याचा द्रष्टेपणा आपल्याला निश्चितपणे गेल्या 75 वर्षांच्या आपल्या लोकशाहीच्या अनुभवातून पाहायला मिळतो, असे फडणवीस म्हणाले.

मी नेहमी गंमतीने असे म्हणतो की, शासन प्रशासन किंवा आमचे सर्व अधिकारी आणि लोक प्रतिनिधी यांच्यासोबत आमचे नाते असे आहे की, आम्ही चालू खाते आहोत आणि तुम्ही मुदत ठेव खाते आहात. चालू खात्यामधून कधीही पैसे काढता येतात, तसे आम्हाला जनता कधीही काढून टाकू शकते, पण तुम्ही मुदत ठेव खाते आहात. त्यामुळे त्या मुदत ठेवीवर तुम्ही किती व्याज देणार हे महत्त्वाचे आहे. तुमच्या या संपूर्ण 60 वर्षाच्या सेवेत किंवा साठाव्या वर्षीपर्यंतच्या सेवेमध्ये तुम्ही जी सेवा लोकांना देता ते तुमच्या सेवेतील व्याज आहे आणि मला असे वाटते की, हे मूल्य मापन आपल्या संपूर्ण सेवेमध्ये आपण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करू शकलो, आपण त्याला काय अधिकच देऊ शकलो अशाप्रकारचे समाधान सेवेची एक प्रेरणा आहे, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

जेव्हा आपण सेवा देणारी संस्था असा विचार करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये नेहमी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा विचार असणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आपल्या कार्यालयामध्ये अनेक वेळा असे लोक येतात ज्या लोकांना नियम माहिती नसतात, कायदे माहिती नसतात, त्यांना कसे वागायेच हे देखील माहित नसते. अनेक वेळा ते उत्तेजित होऊन येतात. त्यांना असे वाटते की किंवा त्याचा भाव असा असतो की, तुम्ही आमचे नोकर आहात, तुम्ही आमचे काम करा. त्यावेळेला मला वाटते की, आपली विवेकबुद्धी ही त्या ठिकाणी शाबूत ठेवून आणि आपल्याला त्याच्याशी योग्य प्रकारे वागावे लागते, त्यांचे म्हणणे समजून घ्यायला लागते आणि त्याचे समाधान करावे लागते. जेव्हा आपली कार्यालये शेवटच्या व्यक्तीला मदत करणारी कार्यालये ठरतात, त्याचवेळी खऱ्या अर्थाने प्रशासनाच्या प्रती आणि शासनाच्या प्रती सामान्य माणसामध्ये सद्भावना तयार होते, असे फडणवीसांनी या कार्यक्रमात सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -