घरमुंबईमुंबईत सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक; मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेणार?

मुंबईत सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक; मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेणार?

Subscribe

मुंबई : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात मराठा आरक्षणावरून वाद होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवसस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय चर्चा होणार याकडे ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे. (All Party OBC Leaders Meet in Mumbai What decision will be taken regarding Maratha reservation)

हेही वाचा – मराठा समाजाच्या पोरांना अडकवण्याचे काही नेत्यांचे षडयंत्र; मनोज जरांगेंचा आरोप

- Advertisement -

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा आमरण उपोषण केल्यानंतर शिंदे समितीच्या निवृत्त न्यामूर्तींनी त्यांची भेट घेतील आणि मराठा आरक्षण देण्यासंदर्भात मुद्दे समजावून सांगितले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकाद 2 महिन्यांची वेळ दिली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलताना दिसत आहे. याशिवाय राज्यात काही ठिकाणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासही सुरुवात झाली आहे. असे असले तरी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास विरोध दर्शविला आहे आणि याचपार्श्वभूमीवर मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रकाश अण्णा शेंडगे, जे. पी. तांडेल , लक्ष्मण गायकवाड यांच्या सहीत राज्यभरातील महत्वाचे ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – आरक्षणाच्या वादात शंभूराज देसाईंची उडी, म्हणाले – “भडक वक्तव्य करण्याची भुजबळांची जूनी सवय”

- Advertisement -

भुजबळांच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ

छगन भुजबळ सोमवारी (6 नोव्हेंबर) बीडमध्ये पत्रकार परिषद घेत ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठा समजाला कुणबीमधून सरसकट आरक्षण देण्यास विरोध दर्शविला आहे. भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेला मराठा समाजाचा विरोध आहे. त्यानंतर आज मुंबईत ओबीसी नेत्याची बैठक होत आहे. याचपार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दंगल नियंत्रण पथक त्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले असून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -