घरमुंबई'वर्षा' बंगल्यामधून चालतो पालिकेचा कारभार; आयुक्तांवर विरोधकांची नाराजी

‘वर्षा’ बंगल्यामधून चालतो पालिकेचा कारभार; आयुक्तांवर विरोधकांची नाराजी

Subscribe

पालिकेचा सर्व कारभार हा आता 'वर्षा' वरूनच हाकला जात असल्याची नाराजी विरोधकांनी व्यक्त केली आहे.

राज्यात सत्ताधारी म्हणून मांडीला मांडी लावून बसणाऱ्या ‘महाविकास आघाडी’मध्ये मुंबई महापालिकेत मात्र ‘बिघाडी’ झाल्याचे निदर्शनास येत आहे. पालिका आयुक्त नेहमीच ‘वर्षा’ बंगल्यावर असतात. ते आम्हा गटनेत्यांना पालिकेत भेट देत नाहीत. त्यामुळे त्यांना ‘वर्षा’ येथेच एक दालन देण्यात यावे. पालिकेचा सर्व कारभार हा आता ‘वर्षा’ वरूनच हाकला जात आहे, या शब्दात समाजवादी पक्षाचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी सत्ताधारी शिवसेना आणि पालिका आयुक्तांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुखावले जाण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. त्याचे पडसाद मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कदाचित घटकपक्षाच्या टिकास्त्राची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून घेतली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही .

सत्ताधारी शिवसेनेसह आयुक्तांवर विरोधकांचे शरसंधान

- Advertisement -

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे गटनेते आणि पालिका विरोधी पक्षनेते रवि राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आणि समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी एकत्रितपणे पालिका मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी काही विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी वरीलप्रमाणे टीकास्त्र सत्ताधारी शिवसेनेवर सोडले. मुंबई महापालिकेचे आयुक्त हे पालिकेत कुणालाच भेटत नाहीत. ते नेहमीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर असतात. हे मी स्वतः पाहिले आहे. वर्षा बंगल्यावरच त्यांना एक दालन द्या. म्हणजे तेथूनच ते पालिकेचा कारभार हाकतील. हे मी खूप जबाबदारीने बोलतो आहे, या शब्दात समाजवादी पक्षाचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करीत सेनेवर टीकास्त्र सोडले. पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून  पुढील तीन वर्षाचा अर्थसंकल्प  हा तुटीचा असणार आहे, अशी शक्यता रईस शेख यांनी यावेळी व्यक्त केली.

एकीकडे श्रीमंत महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट होत असताना पालिका मात्र, पदपथ आणि रस्ता ताब्यात घेणाऱ्या ‘ताज हॉटेल’ला शुल्कापोटी पालिकेला देय असलेली साडेआठ कोटी रुपयांची शुल्क माफी देऊ करीत आहे, असा आरोप रईस शेख यांनी यावेळी केला.

- Advertisement -

५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता

कर सवलतीबाबत स्पष्टता नाही. तसेच होर्डिंग ठेकेदारांनाही वार्षिक दरवाढीमधून काहीशी सवलत दिली जाणार आहे. तर ५०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांना शिवसेनेने वचनाम्यात दिलेल्या अश्वासनाप्रमाणे मालमत्ता करात आधी माफी दिली आता मात्र, त्यात सुधारणा करून वाढीव बिलं पाठविली जाणार आहेत, असे दुटप्पी धोरण सत्ताधारी ‘शिवसेना’ अवळणाबत आहे, असा आरोपही रईस शेख  यांनी यावेळी केला. पालिकेने मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या मालमत्ताधारकांना कर माफ केल्याची घोषणा केली होती. मात्र, मालमत्ता देयकात नमूद असणा-या पाणी, मलनीःसारण आदी करात सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही देयके जेव्हा काढली जातील तेव्हा देयकाच्या रकमेत वाढीव बिलाची रक्कम असेल. याचा आर्थिक फटका मात्र, सर्वसामान्य मालमत्ताधारकांना सहन करावा लागणार आहे, असे सांगत सपाचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी शिवसेनेला डिवचले.


हेही वाचा – मुंबईतील शाळा १५ जानेवारी पर्यंत बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -