Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी नव्या संसद भवनातील सगळं फर्निचर मुंबईत तयार; वाचा सविस्तर

नव्या संसद भवनातील सगळं फर्निचर मुंबईत तयार; वाचा सविस्तर

Subscribe

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज (28 मे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. मोदी सरकारने अत्यंत कमी कालावधीत नवीन संसद भवनाचे काम पूर्ण केले. नवीन इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे.

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज (28 मे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. मोदी सरकारने अत्यंत कमी कालावधीत नवीन संसद भवनाचे काम पूर्ण केले. नवीन इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. मात्र या संसदभवनातील सर्व फर्निचर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, देशाच्या विविध भागातून अनेक कलाकृत बनवून नव्या संसद भवनात लावण्यात आल्या आहेत. (All the furniture in the new parliament building is ready in Mumbai)

देशाचे नवे संसदभवनात वास्तुशास्त्राचा एक अनोखा अविष्कार पाहायला मिळणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध वस्तू आणि सामग्रींनी मिळून हे नवे भवन तयार झाले असल्याने त्यामध्ये संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. अभियंते, प्रशासकीय अधिकारी आणि कामगार तसेच कारागिरांनी विक्रमी वेळेमध्ये वास्तूच्या उभारणीचे काम पूर्ण केले आहे.

- Advertisement -

संसद भवनातील सर्व फर्निचर मुंबईत तयार

संसदेतील सगळे फर्निचर मुंबईत तयार करण्यात आले आहे. संसदभवनाच्या निर्मितीमध्ये वापरण्यात आलेला केशरी हिरव्या रंगाचा दगड उदयपूर येथून, लाल ग्रॅनाईट अजमेरजवळील लाखा येथून तर पांढऱ्या रंगाचे संगमरवर राजस्थानच्या अंबाजी येथून आणण्यात आले आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील सीलिंगसाठी वापरण्यात आलेले स्टील दमण आणि दीव येथून आणण्यात आले आहे. दगडांच्या जाळ्यांची कामे राजस्थानचे राजनगर आणि नोएडा येथे करण्यात आली आहेत.

- Advertisement -

राष्ट्रगीताने संसद उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर संसदेच्या निर्मितीसंबंधीच्या दोन माहितीपट दाखवण्यात आले. यात एक संसदेच्या निर्मितीसंबंधीचा तर दुसरा संसदेत मोदींनी स्थापित केलेल्या सेंगोलसंबंधीत आहे.


हेही वाचा – महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडले, संसद लोकार्पण सोहळ्यावेळी दिल्लीत राडा

- Advertisment -