घरमनोरंजनसुशांत सिंह प्रकरणातील सर्व याचिका हायकोर्टाकडून निकाली

सुशांत सिंह प्रकरणातील सर्व याचिका हायकोर्टाकडून निकाली

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी निकाली काढल्या. सुप्रीम कोर्टाने दोनच दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा हवाला देत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. रेवती मोहिते- डेरे यांच्या खंडपीठाने या याचिका निकाली काढल्या. एका याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. सुभाष झा यांनी कोर्टाला सांगितले की, गेल्यावेळी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अधीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी मुंबईत आला असताना मुंबई महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या अधिकार्‍याला अलगीकरण करण्यास सांगितले.

तपासासाठी आलेल्या अधिकार्‍याला सहकार्य करण्यात आले नाही. त्याच धर्तीवर आता सीबीआयच्या अधिकार्‍यांनाही अलगीकरण करण्यास सांगतील. राज्य सरकार, मुंबई महापालिकेचे वकील उपस्थित येथे उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून आश्वासन घ्यावे की ते सीबीआयच्या अधिकार्‍यांना सर्व सहकार्य करतील. त्यांना अडविण्यात येणार नाही, अशी मागणी झा यांनी कोर्टाकडे केली. त्यावर राज्य सरकार, मुंबई पोलीस किंवा पालिका सीबीआयला सहकार्य करणार नाही, असे याचिकाकर्त्याला वाटत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जावे. याचिकाकर्त्यांनी केवळ भीती व्यक्त केली आहे. खरोखरच तसे घडले तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जावे. आधी तसे होऊ द्या. तसे काही घडल्यास प्रशासनाला सुप्रीम कोर्ट फटकारेल.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयचे अधिकारी येथे येणार आहेत, असे खंडपीठाने स्पष्ट केले. कोलकात्याच्या वकील प्रियांका तब्रेवाल व द्विवेंद्र दुबे या विद्यार्थाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -