Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: मुंबईकरांनो उद्या सर्व लसीकरण केंद्र सुरू राहणार, पण Covaxin लसीचे...

Corona Vaccination: मुंबईकरांनो उद्या सर्व लसीकरण केंद्र सुरू राहणार, पण Covaxin लसीचे डोस ‘यांनाच’ मिळणार

Related Story

- Advertisement -

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना लस, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन अधिक तुटवडा भासत आहे. त्यामुळे परराज्यातून आणि देशातून रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा सध्या राज्याला केला जात आहे. दरम्यान देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे १३२ पैकी केवळ ३७ लसीकरण केंद्र सुरू होती. यामुळे उद्या मुंबईत लसीकरण होणार की नाही? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात निर्माण झाला होता. पण आता मुंबईकरांचा लसीसंदर्भातला प्रश्न सुडलेला आहे. उद्या (सोमवार) मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र सुरू राहतील. कारण मुंबई महापालिकेला दीड लाख सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरवठा झाल्याची माहिती आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.

पण ज्यांना भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लस घ्यायची आहे, त्यांना ही लस मिळणे कठीण होणार आहे. कारण कोव्हॅक्सिन लसीचा साठा सध्या मर्यादित स्वरुपाचा आहे. त्यामुळे ज्यांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यांनाच लस दिली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत काल (शनिवारी) दिवसभरात ५ हजार ८८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ५४९ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईची आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २२ हजार १०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ७१९ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख २९ हजार २३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Covid-19 – माणसांतून मांजरांमध्ये झाले कोरोनाचे संक्रमण!, नवा खुलासा


- Advertisement -

 

- Advertisement -