घरताज्या घडामोडीपोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह मुंबई पोलीस दलातील तीन जणांवर वसुलीचा आरोप

पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह मुंबई पोलीस दलातील तीन जणांवर वसुलीचा आरोप

Subscribe

कोर्टाच्या आदेशानंतर आंबोली पोलिसांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्यात एक डिसीपी रँकचा अधिकारी आहे.

पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील तीन जणांवर वसुली प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून एका प्रॉपर्टी डिलरने वसुलीचा आरोप केला आहे. खोटा गुन्हा दाखल करुन धकमी देऊन १६ लाख वसूल केल्याचा आरोप प्रॉपर्टी डीलरकडून पोलिसांवर करण्यात आला आहे. २०१९-२० मधील ही घटना असल्याचा दावा व्यापाऱ्याने केला आहे. यासाठी त्यांनी अंधेरी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा तपास करुन योग्य कारवाई करण्याचे आदेश अंधेरी कोर्टाकडून देण्यात आले होते. कोर्टाच्या आदेशानंतर आंबोली पोलिसांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्यात एक डिसीपी रँकचा अधिकारी आहे.

- Advertisement -

या व्यापाऱ्याने याआधी देखील हायकोर्टात धाव घेतली होती. तेव्हा त्यांनी पीआयएल दाखल करुन अशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अँडिशनल कमिशनर क्राइमनी या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यावेळी जॉईन सीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात अँफेडेव्हिड देखील सादर केले होते. मात्र त्या व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले होते ज्यामुळे हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली होती. मात्र त्याच तक्रीवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना मोदी, शहांचा फोन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -