घरCORONA UPDATEसलून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या अन्यथा आर्थिक पॅकेज जाहीर करा!  

सलून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या अन्यथा आर्थिक पॅकेज जाहीर करा!  

Subscribe

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून १९ मार्चपासून सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

मार्च महिन्यापासून बंद असलेले सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या, अन्यथा आर्थिक मदत करा, अशी मागणी अंबरनाथ श्री संतसेना  नाभिक समाज मंडळातर्फे करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने  संघटनेचे अध्यक्ष विनोद गवळी, उपाध्यक्ष भिकाजी सकपाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अंबरनाथ तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून १९ मार्चपासून सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. सलून व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी करण्यात आली मात्र त्याची अद्याप दखल घेतली गेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत इतर व्यवसायांना काही प्रमाणात सूट देऊन व्यवसाय सुरु करण्यास  परवानगी देण्यात आली आहे. मात्र सलून व्यवसाय सुरु करण्याला परवानगी दिली नसल्याची खंत निवेदनात नमूद करण्यात आली आहे. तसेच सलून व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे, विमा संरक्षण द्यावे, लॉकडाऊन काळातील सलून व्यावसायिकांचे दुकान भाडे आणि विजेचे बिल माफ करावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -