Mumbai Road Accident : मुंबईतील जवळपास निम्मे रस्ते अपघात दुचाकी वाहनांमुळेच, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

2020 मध्ये मुंबई शहरातील 1,812 रस्ते अपघातांमध्ये 350 लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकाऱ्याने सांगितले

Almost half of accident fatalities in Mumbai involve two-wheelers: Report

मुंबईतील रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 47 टक्क्यांहून अधिक मृत्यू दुचाकी वाहनांमुळे झाल्याचा धक्कादायक खुलासा एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे. (Mumbai Two Wheeler Accident Cases) यामुळे पोलिसांनी आता दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतल्याचे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले आहे. (Mumbai Road Accident)

2020 मध्ये मुंबई शहरातील 1,812 रस्ते अपघातांमध्ये 350 लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकाऱ्याने सांगितले. ट्रॅफिक पोलिसांच्या एका डेटानुसार, 166 म्हणजे 47.42 रस्ते अपघातात दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

दरम्यान रस्ते अपघातात झालेल्या मृतांची आकडेवारीकडे नजर टाकल्यास ,तब्बल 148 (42.28 टक्के) मृत्यूंमध्ये पादचाऱ्यांचा समावेश होता. 22 (6.28 टक्के) मृत्यांमध्ये चारचाकी वाहनांचा, आठ (किंवा 2.28 टक्के) मृत्यांमध्ये तीनचाकी आणि सहा (1.71 टक्के) मृतांमध्ये दुचाकीस्वारांचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अधिसूचना जारी करून दुचाकीस्वारांनाही हेल्मेट सक्तीचे केले आहे.

आरटीओ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच संसदीय सदस्य रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत रस्ते अपघातातील मृत्यूचे विश्लेषण डेटा सादर करण्यात आला. (Mumbai Two Wheeler Accident) सेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाढत्या रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आणि नवीन हेल्मेट निर्णयाची सूचना देऊन दुचाकी अपघातांना आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, रॅश ड्रायव्हिंग करणे, सिग्नल जंप करणे आणि वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे यासारख्या कारणांमुळे दुचाकीस्वारांवर दाखल वाहतूक गुन्ह्यांबाबत समितीने चिंता व्यक्त केली. (Accidents In Mumbai)

31 मार्च 2022 पर्यंत मुंबईतील वाहनांची संख्या 42.85 लाख आहे. यापैकी 25.41 लाख वाहनं ही दुचाकी आहे. त्यानंतर 12.45 लाख चारचाकी आणि 2.33 लाख ऑटो रिक्षा इतर प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे, अशी माहिती RTO ने दिली आहे. मुंबई शहरामध्ये आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये वाहनसंख्येमध्ये 4.44 टक्के वाढ झाली. मागील वर्षात ही वाढ 4.93 टक्के होती.


Monsoon Update : मान्सूनची अरबी समुद्रातून पुढे वाटचाल; महाराष्ट्रात केव्हा आगमन?