घरटेक-वेकआता १०० लोकांसोबत पहाता येणार अमेझॉन प्राइम व्हिडिओ

आता १०० लोकांसोबत पहाता येणार अमेझॉन प्राइम व्हिडिओ

Subscribe

वॉच पार्टी या फिचर वापरून १०० लोकांसोबत अमेझॉन प्राइम व्हिडिओ पाहू शकता. मात्र त्यासाठी अमेझॉन प्राइमचे सबस्क्रिप्शन असणे गरजेचे आहे.

अमेझॉनने आता भारतातही प्राइम व्हिडिओसाठी वॉच पार्टी (Watch Party ) हे फिचर द्यायला सुरूवात केली आहे . जे अमेझॉन प्राइमचे सदस्य आहेत त्यांना हे वॉच पार्टी फिचर फ्रीमध्ये मिळणार आहे. अमेझॉनने प्राइम व्हिडिओसाठी वॉच पार्टी हे फिचर काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत पहिल्यांदा लॉन्ज केले होते. त्यानंतर आता हे फिचर भारतातही लॉन्ज केले जाणार आहे.

वॉच पार्टी या फिचर वापरून १०० लोकांसोबत अमेझॉन प्राइम व्हिडिओ पाहू शकता. मात्र त्यासाठी अमेझॉन प्राइमचे सबस्क्रिप्शन असणे गरजेचे आहे. वॉच पार्टीमध्ये एकमेकांसोबत प्राइम व्हिडिओवर सिनेमा, वेबसीरिज पाहू शकतो. त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींसोबत चॅटींगही करता येणार आहे. हे फिचर दोन वेब ब्राउजर पर्यत मर्यादित असेल. गुगल आणि फायरफॉक्स या दोन ब्राउजरवरून हे फिचर वापरता येणार आहे.

- Advertisement -
वॉच पार्टीवर प्राइम व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायचे?
  • क्रोम किंवा फायरफॉक्समध्ये प्राइम व्हिडिओच्या वेबसाइटवर जावे लागेल. तिथे अमेझॉन अकाऊंट लॉग इन करा. त्यात प्राइम मेंबर्स हा ऑप्शन मिळेल.
  • कोणत्याही सिनेमाच्या किंवा वेबसीरिजच्या थमनेलच्या खाली वॉच पार्टी (Watch Party ) हा ऑप्शन दिसेल. तिथे क्लिक केल्यावर मित्रांना तिथे एन्ड करता येईल.
  • त्याचप्रमाणे क्रिएट वॉच पार्टी (Create wach Party ) असा ऑप्शनही आहे. तिथे एक लिंक दिली जाईल जी मित्रांमध्ये शेअर करावी लागेल.

कप्युटरवर क्रोम किंवा फायरफॉक्स ब्राउझर वापरताना तुम्ही ज्यांना लिंक पाठवली आहे ते तुमच्या अकाऊंवर येतील. मात्र त्यासाठी त्यांच्याकडेही अमेझॉन प्राइमचे सबस्क्रिप्शन असायला हवे. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी या वॉच पार्टीची लिंक दुसऱ्यांनसोबत शेअर केली आहे त्याच्याकडे व्हिडिओ कंटेट कंट्रोल करता येऊ शकतो. म्हणजेच तो व्यक्ती व्हिडिओ प्ले करणे, पॉज करणे किंवा फॉरवर्ड करू शकतो.


हेही वाचा – अननस मिल्क शेक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -