Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Ambani bomb scare case: सचिन वाझेच्या NIA कोठडीत पुन्हा वाढ, CBIला चौकशीसाठी...

Ambani bomb scare case: सचिन वाझेच्या NIA कोठडीत पुन्हा वाढ, CBIला चौकशीसाठी दिली परवानगी

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरण आणि मनुसख हिरेन हत्या प्रकरण निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या एनआयए (NIA) कोठडी वाढ झाली आहे. आज वाझेच्या कोठडीचा शेवटचा दिवस होता त्यामुळे त्याला एनआयएच्या विशेष कोर्टात दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा एनआयए कोर्टाने वाझेच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली असून ९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच एनआयए कोठडीदरम्यान सीबीआयलाही चौकशीची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा एनआयएचे पथक सचिन वाझेला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर नाट्यरुपांतर करण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर एनआयएच्या टीमला मनसुख हिरेन हत्या प्रकरणी (mansukh hiren murder case) मोठे यश आले. याबाबतचा मोठा खुलासा झाला असून ४ मार्चला सीएसएमटी स्टेशनकडे जातानाचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले आहेत. तसेच काल (मंगळवार) हिरेन यांच्या हत्येनंतर वाझेने केलेला खोटा ड्रामा देखील उघडकीस आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर NIAने हिरेन हत्येत वाझेचे कनेक्शन शोधलेच, महत्त्वाचे CCTV फुटेज हाती

काही दिवसांपूर्वी मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील वाझेची साथीदार मीना जॉर्जला एनआयएने अटक केली होती. याप्रकरणात एकूण आठ गाड्या एनआयएने जप्त केल्या आहेत. यामधली एक बाईक वाझेची मैत्रिण मीना जॉर्ज हिच्या नावावर असल्याचे समोर आले. या बाईकची किंमत तब्बल साडे सात लाख इतकी आहे. पण या बाईकची याप्रकरणामध्ये नेमकी भूमिका काय आहे? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही बाईक दमन येथून जप्त करण्यात आली होती.
- Advertisement -